घरताज्या घडामोडीOmicron Symptom: सावधान! त्वचेवर दिसणारी 'ही' लक्षणे असू शकतात ओमिक्रॉनची

Omicron Symptom: सावधान! त्वचेवर दिसणारी ‘ही’ लक्षणे असू शकतात ओमिक्रॉनची

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंतचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. डेल्टापेक्षा जरी ओमिक्रॉनची घातकता कमी असली तरी संसर्ग वेगाने वाढत आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची लक्षणेसुद्धा वेगळी आहेत. सध्या आरोग्य तज्ज्ञ ओमिक्रॉनच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देत आहेत. कारण वेळीच या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळवता येईल.

ओमिक्रॉनचे असामान्य लक्षणे

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, आतापर्यंत ओमिक्रॉनची बरीच लक्षणे लोकांना माहित झाली आहेत. परंतु एक असे लक्षण आहे, ज्यावर लोकांची नजर गेली नाही. त्यामुळे तज्ज्ञांनी लोकांना त्वचेवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. या व्हेरिएंटमुळे त्वचेवर रॅशेज (पुरळ) (Skin Rashes) येऊ शकतात. ZOE कोविड लक्षणे स्टडी अॅपनुसार, ओमिक्रॉन संक्रमित झालेल्या रुग्णांनी जास्त करून त्वचेवर चकत्ते येण्याची तक्रार केली आहे. त्यामुळे हे एक प्रमुख लक्षण आहे. म्हणून या लक्षणाकडे चुकूनही दुर्लक्ष केले नाही पाहिजे.

- Advertisement -

दोन प्रकारचे स्किन रॅशेज

तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉन लक्षणांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्किन रॅशेज पाहायला मिळाले आहेत. पहिल्यामध्ये स्किन रॅशेजची समस्या अचानक खूप जास्त दिसते. त्यामुळे खाज जास्त प्रमाणात येते. सर्वसाधारणपणे तळहातावर आणि तळव्यांवर खाज येण्यास सुरुवात होते. दुसऱ्या प्रकारात रॅशेज घामोळ्या प्रमाणे असतात, जे संपूर्ण शरीरावर येतात. कोपर, गुडघे, हात आणि पायाच्या त्वचेवर अशाप्रकारच्या रॅशेज अधिक आढळतात.


हेही वाचा – Omicron Symptoms : लसवंतांमध्ये दिसतायत ओमिक्रॉनची ‘ही’ लक्षणे, तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -