घरमनोरंजन'आई मी आणि आळस' ; धमाल व्हायरल Video

‘आई मी आणि आळस’ ; धमाल व्हायरल Video

Subscribe

भाडिपाचा 'आई, मी आणि आळस' हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी शेअर केली असून, त्याला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या स्टॅणडअप कॉमेडी शोजमध्ये सध्या ‘भाडिपा’ हे मराठमोळं नाव चांगलंच गाजत आहे. भाडिपा अर्थात भारतीय डिजीटल पार्टी या ग्रुपने आजवर वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ, स्टॅण्डअप कॉमेडी शोज तसंच कास्टिगं काऊच यासारखे अनेक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणले आहेत. आजवर त्यांनी आपल्या कार्यक्रमांमधून नेटकऱ्यांचं तुफान मनोरंजन केलं आहे. मराठी प्रेक्षकांनीही भाडिपाच्या कार्यक्रमांना भरभरुन प्रतिसाद आणि पसंती दिली आहे. याच धर्तीवर आता ‘भाडिपा’ने त्यांच्या ‘आई आणि मी’ या लोकप्रिय सिरीजमधील एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. ‘आई मी आणि आळस’ असं या व्हिडिओचं टायटल असून, सध्या फेसबुक आणि युट्यूबवर याच व्हिडीओचा बोलबाला आहे. भाडिपाच्या ‘आई आणि मी’ या सिरीजमधील याआधी आलेल ‘आई मी आणि गणपती’ आणि ‘आई मी आणि प्रायव्हसी’ हे दोनही व्हिडिओ तुफान लोकप्रिय झाले होते. त्यापाठोपाठ आता ‘आई मी आणि आळस’ या व्हिडिओलाही नेटिझन्सची पसंती मिळते आहे.

- Advertisement -

‘आई आणि मी’च्या व्हिडीओजमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेणुका दफ्तरदार आणि मुलाची भूमिका साकरणारा अलोक राजवाडे, ही जोडी ‘आई मी आणि आळस’ या व्हिडिओतही दिसणार आहे. तरुण पिढीचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्आ आळसाबद्दल आणि त्यावर होणाऱ्या आईच्या चिडचिडीवर हा व्हिडिओ भाष्य करतो. सण जवळ आला की आईने मुलांना कामाची भलीमोठी यादी देणे आणि ती कामं करण्यामध्ये मुलांनी आळस करणे, हे चित्र आपल्याला घरोघरी दिसतं. याचीच धमाल विनोदी आणि वास्तववादी गुंफण या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे. बहुधा याच कारणामुळे जास्तीत जास्त लोक या  व्हिडिओशी स्वत:ला रिलेट करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतो आहे. ‘आई, मी आणि आळस’ हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी शेअर केली असून, त्याला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -