घरमहाराष्ट्रतर मेधा कुलकर्णी भाकऱ्या भाजत असत्या - चित्रा वाघ

तर मेधा कुलकर्णी भाकऱ्या भाजत असत्या – चित्रा वाघ

Subscribe

ब्राह्मण समाज देशाचे नेतृत्व करत राहिल भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णींनी केलेल्या वक्तव्यावरून आता चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप आमदार मेधा कुलकर्णींनी ‘ब्राह्मण समाज देशाचे नेतृत्व करत राहिल’ केलेल्या वक्तव्यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. कुलकर्णींच्या या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. समाजात असमानता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे लक्षात येत कसे नाही की ब्राह्मण समाजाने यापूर्वीही देशाचे नेतृत्व केले होते आणि भविष्यातही करत राहील. असे विधान मेधा कुलकर्णी यांनी केले होते. त्याला आता चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीनं विशिष्ट समाजाला पुरस्कृत करणं चुकीचं आहे. शाहू, फुले, आंबेडकर झिजले नसते तर आमदार मेधा कुलकर्णी घरात भाकऱ्या थापत बसल्या असत्या. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी कुलकर्णी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामार्फत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ब्रह्मोद्योग २०१८ महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी हे विधान केले.

- Advertisement -

काय म्हणाल्या कुलकर्णी

‘माऊली ज्ञानेश्वरांनी दुसऱ्यांसाठी पसायदान मागितले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी आयुष्य झिजवले. ब्राह्मण समाज पूर्वीपासूनच समाजासाठी झटत आला आहे. ब्राह्मणांनी अनुयत्व पत्करले. परंतु देशाची अखंडता टिकवली.’

चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

मेधा कुलकर्णी यांनी पवारांवर टीका करण्यापेक्षा लोकांची कामं करावीत. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. म्हणून बेताल वक्तव्य करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. साहेब नसते, शाहु, फुले, आंबेडकर नसते तर मेधा कुलकर्णी कुठेतरी भाकऱ्या भाजत बसल्या असत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -