घरमहाराष्ट्र'अरबी समुद्रातील शिवस्मारकाला पुरूषोत्तम खेडेकरांचा विरोध'

‘अरबी समुद्रातील शिवस्मारकाला पुरूषोत्तम खेडेकरांचा विरोध’

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बांधण्याऐवजी राजभवनाच्या जागी बांधा अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष परूषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. बोटीला झालेल्या अपघातानंतर त्यांनी विरोध केला आहे.

शिवाजी महाराजांचं स्नारक अरबी समुद्रात नको अशा शब्दात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केला आहे. स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान बोटीला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर खेडेकर यांनी आता स्मारकाला विरोध केला आहे. तुम्हाला जर शिवस्मारक बांधायचे असेल तर ते राजभवनाच्या जागी बांधा असे मत पुरूषोत्तम खेडेकर यांनी मांडले आहे. खेडेकर यांनी विरोध केल्यानंतर अद्याप तरी त्यावर कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही. बुधवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी स्मारकाच्या पायाभरणीसाठी जात असताना खडकाला आदळून बोटीला अपघात झाला. यामध्ये सीए असलेल्या सिद्धेश पवारचा मृत्यू देखील झाला आहे. त्यानंतर आता मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी अरबी समुद्रातील शिवस्नारकाला विरोध केला आहे. एल अँड टी कंपनीला या स्मारकाचं बांधकाम देण्यात आलं आहे. पुढील तिन वर्षामध्ये शिवस्मारकाचं बांधकाम पूर्ण करण्याचं उदिष्ट आहे.

वाचा – शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या स्पीडबोटला अपघात

शिवस्मारकाला अपघात

बुधवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी स्मारकाच्या पायाभरणीसाठी जात असताना स्पीड बोटला अपघात झाला. त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, त्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवली गेली. तर विनायक मेटेंना गप्प करण्यासाठी हा सारा डाव असल्याची चर्चा देखील रंगली आहे. उद्गाटनापूर्वी मेटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवस्मारका संदर्भात लिहिलेलं पत्र देखील समोर आलं होतं. त्यामध्ये स्नारकाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यानंतर सरकार आता काय पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

वाचा – शिवस्मारकाच्या पायाभरणी शुभारंभाला जात असताना अशी बुडाली बोट…

असे असेल शिवस्मारक आणि उंची

  • पूर्वी पुतळ्याची उंची 160 मीटर होती, ती आता 126 मीटर झाली.
  • पूर्वी चौथर्‍याची उंची 30 मीटर होती, ती आता 84 मीटर झाली.
  • पूर्वी स्मारकाची उंची 190 मीटर होती, ती आता 210 मीटर झाली.

कसं असेल शिवस्मारक

जलदुर्गाशी साधर्म्य असणारी दगडातील समुद्र तटबंदी, आई तुळजाभवानी मंदिर, कला संग्रहालय, ग्रंथ संग्रहालय, मत्स्यालय, अ‍ॅम्पिथिएटर / हेलीपॅड, ऑडीटोरीअम, लाईट व साऊंड शो, विस्तीर्ण बागबगीचे, रुग्णालय, सुरक्षा रक्षक निवासस्थाने,आयमॅक्स सिनेमागृह, प्रकल्पस्थळ ठिकाणी २ जेट्टी, चौथर्‍यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनासाठी सोय, पर्यटकांना स्मारकाकडे जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नवी मुंबई व इतर ठिकाणांहून जाण्याची व्यवस्था, स्मारक ठिकाणी शिवकालिन वातावरण निर्मिती.

वाचा – शिवस्मारकाच्या बांधकामात भोंगळ कारभार; मेटेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -