घरक्रीडास्टेडियमबाहेर हेलीकॉप्टर दुर्घटना; संघ मालकाचा मृत्यू

स्टेडियमबाहेर हेलीकॉप्टर दुर्घटना; संघ मालकाचा मृत्यू

Subscribe

इंग्लंडमधील व्यावसायिक फुटबॉल संघ लेस्टर सिटीच्या स्टेडियमबाहेर संघमालक विचाई श्रीवधनप्रभा यांच्या हेलीकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात श्रीवधनप्रभा यांचा मृत्यू झाला.

शनिवार २७ ऑक्टोबर रोजी लेस्टर सिटी या संघाचा इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये वेस्टहॅम या संघाविरूध्द सामना झाला. हा सामना पाहायला लेस्टर सिटीचे संघमालक विचाई श्रीवधनप्रभा उपस्थित होते. सामना संपल्यानंतर ते आपल्या हेलकॉप्टरमधून लंडनला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, लेस्टर सिटीच्या किंग पॉवर स्टेडियमबाहेर त्यांच्या हेलीकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यात श्रीवधनप्रभा यांनी आपले प्राण गमावले.

- Advertisement -

हेलीकॉप्टर अपघातात ५ जणांचा मृत्यू 

या हेलीकॉप्टर अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. श्रीवधनप्रभा यांच्यासोबत त्यांचे दोन कर्मचारी तसेच हेलीकॉप्टरचे पायलट आणि सहायक पायलट यांचाही मृत्यू झाला. शनिवारी लेस्टर आणि वेस्टहॅमचा सामना संपल्यानंतर श्रीवधनप्रभा लंडनला जाण्यासाठी निघाले. ते स्वतःच्या हेलीकॉप्टरमधूनच निघाले होते. हे हेलीकॉप्टर लेस्टरच्या किंग पॉवर स्टेडियमबाहेर कसेबसे निघाले. पण बाहेर निघताच ते गोल फिरू लागले आणि त्याचा अपघात झाला. या हेलीकॉप्टरचा स्फोट झाला. ज्याची आग वीजवायला २० मिनटांहूनही अधिक वेळ लागला.

 

हेलीकॉप्टर दुर्घटना (सौ-Dailystar)

काहीही अशक्य नाही

थायलंडचे व्यवसायी विचाई श्रीवधनप्रभा यांनी २०१० मध्ये लेस्टर सिटी हा इंग्लंडमधील व्यावसायिक फुटबॉल संघ विकत घेतला होता. त्यावेळी हा संघ फारसा नावाजलेला किंवा फार मोठा संघ नव्हता. पण श्रीवधनप्रभा यांच्या नेतृत्वाखाली या संघाने दरवर्षी प्रगती केली आणि कोणालाही अपेक्षा नसताना या संघाने २०१५-१६ मोसमात इंग्लिश प्रीमियर लीग जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे श्रीवधनप्रभा यांनी काहीही अशक्य नाही हे जगाला दाखवून दिले होते.
लेस्टर सिटी (सौ-Fox Sports)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -