घरताज्या घडामोडीRRR: अखेर प्रतिक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'आरआरआर'

RRR: अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘आरआरआर’

Subscribe

सिनेमा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7 जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेमा लांबणीवर पडला. याआधी निर्मात्यांनी सिनेमा रिलीज करण्यासाठी दोन तारखा घोषित केल्या होत्या.

बहुप्रतिक्षीत आरआरआर (RRR Release Date)  या सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभमूीवर सिनेमाची रिलज डेट पुढे ढकलण्यात आली होती. अखेर प्रेक्षकांनी प्रतिक्षा संपली असून आरआरआर सिनेमाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्विट करत सिनेमाच्या नवीन रिलीज डेटची माहिती दिली आहे. ज्युनिअर एनटीआर (JR.NTR)  आणि रामचरण (Ramcharan)  स्टारर आरआरआर हा सिनेमा 25मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (RRR movie release on 25 march 2022)  सिनेमाच्या रिलीज डेटच्या घोषणेने प्रेक्षक आता सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

- Advertisement -

आरआरआर सिनेमा रिलीज करण्यासाठी सिनेमाचे निर्माते योग्य वेळीची वाट पाहत होती. सिनेमा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7 जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेमा लांबणीवर पडला. याआधी निर्मात्यांनी सिनेमा रिलीज करण्यासाठी दोन तारखा घोषित केल्या होत्या. ‘देश सध्या कोरोना महामारीचा सामना करत असून देशातील अनेक राज्यातील थिएटर्स देखील बंद आहेत. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर 18 मार्च 2022 किंवा 28 एप्रिल 2022 रोजी सिनेमा रिलीज करण्यात येईल’, असे सांगण्यात आले होते. अखेर निर्मात्यांनी 25 मार्च रोजी सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरआरआर सिनेमाची कहाणी 1920मधील अल्लूरी आणि कोमाराम यांच्या जिवनावर आधारित आहे. ब्रिटिश आणि हैद्राबाद निजाम यांच्यातील लढाई सिनेमात दाखवण्यात येणार आहे. सिनेमा हिंदी तसेच तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिनेमात ज्युनिअर एनटीआरसह अभिनेता रामचरण आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अजय देवगण देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आरआरआर ट्रेलर रिव्ह्यू

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -