घरताज्या घडामोडीअरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनात बेपत्ता झालेले ७ जवान शहीद

अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनात बेपत्ता झालेले ७ जवान शहीद

Subscribe

अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh)कामेंग सेक्टर (Kameng Sector)मध्ये रविवारी झालेल्या हिमस्खलनात ७ जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलनानंतर हे जवान बेपत्ता होते. हे सर्व जवान कामेंग सेक्टरमधील गस्त दलाचे होते.

गेल्या काही दिवसांपासून कामेंग सेक्टर भागात जोरदार बर्फवृष्टी होत असून वातावरणही खराब झाले आहे. या भागात गस्तदलाची एक टीम तैनात करण्यात आली होती. रविवारी या भागात अचानक हवामान बदलले आणि हिमवृष्टी होऊ लागली. त्यानंतर झालेल्या हिमस्खलनात हे ७ जवान अडकले.

- Advertisement -

जवान हिमस्खलनात अडकल्याचे कळताच विशेष बचाव पथकाला एअरलिफ्ट करण्यात आले. पण खराब वातावरण आणि बर्फवृष्टी यामुळे बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरला घटनास्थळी उतरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जागोजागी बर्फाचे ढिगारे उभे राहील्याने बचाव पथकाला जवानांना शोधणे कठीण झाले होते. यामुळे ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. पण नंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह सापडले.

- Advertisement -

“सात जवानांचे मृतदेह  बाहेर काढण्यात आले असून अडकलेल्या सात जवानांना वाचवण्यात आम्हाला अपयश आल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच  हिमस्खलन झालं, ते ठिकाण समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार ५०० फुटांच्या उंचीवर असून गेल्या काही दिवसांपासून या भागातील हवामान खराब झालं होतं. असं देखील लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -