बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता या चित्रपटाने फर्स्ट विकेंड म्हणजेच तीन दिवसात ५०० कोटींहून अधिक जास्त वर्ल्ड वाईड कमाई करून इतिहास रचला आहे. ५५० कोटींहून जास्त बजेटने तयार झालेल्या ‘RRR’ने तीन दिवसात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
तरण आदर्शने पोस्ट शेअर करून सांगितले की, ‘भारताचा बिगेस्ट ब्लॉकबस्टर चित्रपट ‘RRR’ ठरला आहे. चित्रपटाने फक्त तीन दिवसात जगभरात ५०० कोटी रुपयांहून जास्त कमाई करून एक नवा बेंचमार्क सेट केला आहे.’ राम चरण तेजा, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट स्टारर असलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी (रविवार) १३० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. त्यापूर्वी प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवार) ११४.३८ कोटी आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) म्हणजे प्रदर्शित झाला तेव्हा २५७.१५ कोटी रुपयांचा वर्ल्ड वाईड ग्रॉस बिझनेस केला होता.
#RRR is setting new BENCHMARKS… ₹ 500 cr [and counting]… WORLDWIDE GBOC *opening weekend* biz… EXTRAORDINARY Monday on the cards… #SSRajamouli brings back glory of INDIAN CINEMA. Note: Non-holiday release. Pandemic era. pic.twitter.com/ztuu4r9eam
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2022
हिंदी व्हर्जनने केली ७५ कोटींची कमाई
माहितीनुसार, ‘RRR’ने सलग दिसऱ्या दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने तीन दिवसात एकूण १२६ कोटींहून जास्त कमाई केली आहे. तरण आदर्शने दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितले की, ”RRR’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने भारतात तिसऱ्या दिवशी ३१.५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यापूर्वी दुसऱ्या दिवशी २४ कोटी आणि पहिल्या दिवशी १९ कोटींहून अधिक कमाई केली होती. या हिशोबाने चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने भारतात पहिल्या विकेंड म्हणजेच तीन दिवसात आतापर्यंत ७४.५० कोटी रुपयांहून अधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.’
#RRR #Hindi is SENSATIONAL, biz jumps on Day 3… FIRST *HINDI* FILM TO CROSS ₹ 30 CR IN A SINGLE DAY [pandemic era]… Mass centres EXCEPTIONAL… SupeRRRb trending gives hope for a STRONG Day 4 [Mon]… Fri 19 cr, Sat 24 cr, Sun 31.50 cr. Total: ₹ 74.50 cr. #India biz. pic.twitter.com/zuYKz90RF6
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2022
हेही वाचा – घटस्फोटावर आमिर खानचं मोठं विधान; म्हणाला, ‘माझ्या मनात अजूनही…’