घररायगडजलपर्णी, सांडपाण्यामुळे उल्हास नदी दुषित

जलपर्णी, सांडपाण्यामुळे उल्हास नदी दुषित

Subscribe

कर्जत, नेरळ भागातून वाहणार्‍या उल्हास नदीचा उगम लोणावळा भागातून होतो. डोंगरातील पाणी उल्हासनदीला येऊन मिळते. याच पाण्यावर कर्जत तालुक्यातील अनेक गावांना उल्हासनदीतून पाणी योजना सुरू आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी याच उल्हास नदीचा आधार आहे.

कर्जत तालुक्यातून वाहत जाणार्‍या उल्हास नदीला सध्या जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदी पात्रात पाण्यावर मोठया प्रमाणात जलपर्णी जमा झाली आहे. तसेच अनेक भागात नाल्यातून मोठया प्रमाणात सांडपाणी नदीत येत असल्याने नदीतील पाणी दुषित झाल्याचे दिसून आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी पुढे येत आहे.

कर्जत, नेरळ भागातून वाहणार्‍या उल्हास नदीचा उगम लोणावळा भागातून होतो. डोंगरातील पाणी उल्हासनदीला येऊन मिळते. याच पाण्यावर कर्जत तालुक्यातील अनेक गावांना उल्हासनदीतून पाणी योजना सुरू आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी याच उल्हास नदीचा आधार आहे. परंतू सध्या उल्हास नदीला जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. बहुंताश पाणी योजनांना फिल्टर प्लॅन्ट नसल्याने पाईपाद्वारे येणारा दुषित पाणी प्यावे लागत असल्याने यात आता अधिकच भर पडली आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर देखील परिमाण होणार आहे.

- Advertisement -

कर्जत भागातून आणि नेरळ शहरातून संपूर्ण गटारांचा सांडपाणी नाल्यातून उल्हास नदीत मिसळला जातो. आणि परिणामी शेलू, वांगणी तसेच परिसरातील नागरिकांना दुषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात दुषित पाण्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यावर जलपर्णी जमा झाली असून याकडे कुणाचेही लक्ष नाही, उल्हास नदीत मिळणार्‍या जलपर्णीकडे आणि सांडपाण्याकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच सामाजिक कार्यकर्ते नदी स्वछतेसाठीसाठी पुढाकार घेणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील एकमेव बारमाही वाहणारी नदी म्हणून उल्हासनदीची ओळख आहे. दोन ते तीन दिवसापासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत येत असून सर्व पाणी दुषित झाले आहे. ही जलपर्णी अशीच सर्वत्र पसरली तर ाणी हिरवेगार आणि प्रदुषित होऊ शकते. अलिकडच्या काळात नेरळ आणि परिसरात ज्या पध्दतीने गृहसंकुलांचा विस्तार होत आहे ते पाहता पुढील काळात सांडपाण्याचे नियोजन न झाल्यास ते सर्व नदी पात्रात येईल. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखणे आवश्यक असून त्यावर योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे. उल्हास नदी ही पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असून सर्व गृहसंकुलांना सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्यांची पुर्तता जर विकासकाने केली नाही तर अशा प्रकल्पांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई करावी.
– केशव तरे, उल्हास नदी संवर्धन समुह, नेरळ परिसर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -