घरमुंबईचोरीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

चोरीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

Subscribe

चोरीची सोन्याची चैन, 19 मोबाईल आणि घड्याळ जप्त

मुंबई:-चोरीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सोमवारी जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. विनोद चंद्रपाल वाल्मिकी आणि रवी हिरदयालाल पासी अशी या दोघांची नावे असून त्याच्याकडून चोरीची एक सोन्याची चैन, 24 विविध कंपनीचे मोबाईल आणि एक मनगटी घड्याळ आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्या अटकेने जुहू येथील दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिवाळी सण असल्याने परिसरात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी गुन्हे शाखेला परिसरात गस्त घालण्याचे आदेश दिले होते. सोमवारी जुहू पोलिसांचे एक विशेष पथक विलेपार्ले परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बिरादार व अन्य पोलीस पथकाने संशयास्पद फिरणार्‍या रवी पासी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सव्वालाख रुपयांचे घड्याळ, चैन आणि एकोणीस मोबाईल सापडले.

अनेक गुन्ह्यांची नोंद

चौकशीत त्याने हा मुद्देमाल जुहू पोलीस ठाण्यातून चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दोन गुन्ह्यांची नोंद होती, या दोन्ही गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. त्याच्या चौकशीत त्याच्याविरुद्ध वर्सोवा, आंबोली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. अन्य एका घटनेत एपीआय बोलमवाड व अन्य पोलीस पथकाने गस्तीदरम्यान विनोद वाल्मिकी या गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून पेालिसांनी पाच मोबाईल जप्त केले आहे. ते मोबाईल त्याने सहार परिसरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. या दोन्ही गुन्ह्यांत रवि पासी आणि विनोद वाल्मिकी यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -