घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत महत्त्व नाही म्हणून काँग्रेसच्या २५ आमदारांचं पक्षप्रमुखांना पत्र; दरेकरांचा दावा

महाविकास आघाडीत महत्त्व नाही म्हणून काँग्रेसच्या २५ आमदारांचं पक्षप्रमुखांना पत्र; दरेकरांचा दावा

Subscribe

काँग्रेसच्या २५ आमदारांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना सत्तेत असून देखील काम होत नसल्यामुळे तसंच महाविकास आघाडीत महत्त्व देत नसल्यामुळे त्या २५ आमदारांनी पत्र लिहिलं असावं असा दावा केला.

काँग्रेसच्या २५ आमदारांच्या पत्रामुळे जोरदारा चर्चा सुरु आहे. त्यावर दरेकर म्हणाले, हा काही भाजपचा विषय नाही, तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचं खच्चिकरण केलं जात आहे. त्या पक्षाला विकासकामांसाठीचा निधी असो, त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा विषय असो, याकडे महाविकास आघाडीचा दुर्लक्ष आहे. किंबहूना हे पक्ष तोकडे पडत आहेत. किंवा राष्ट्रवादी जुमानत नाही. त्यामुळे अशा परिस्थिती आपल्या पक्षाचं अस्तित्व कसं टिकवायचं हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे , असा दरेकर म्हणाले. तसंच पुढे बोलताना दरेकर म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये अनेक विषय निर्माण झाले आहेत. सत्तेत असून कामं होत नाहीत म्हणून आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे इथे कोणी न्याय देऊ शकणार नाही, यासाठी पक्षनेतृत्वाला आमदारांनी पत्र लिहिलं असावं, असं दरेकर म्हणाले.

- Advertisement -

थोपटेंच्या लेटरहेडवरुन सोनिया गांधींना पत्र

काँग्रेसच्या २५ आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हे पत्र कोणत्या आमदाराच्या नेतृत्वात लिहिलं याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर ते देखील समोर आलं. काँग्रेसच्या या नाराज आमदारांचे पत्र अखेर समोर आले आहे. हे पत्र पुण्यातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरून लिहण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या गटाचे नेतृत्त्व संग्राम थोपटे हे करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, थोपटे यांनी कोणतेही आमदारा नाराज नसल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -