घरताज्या घडामोडीपुरातत्व विभागाशी संपर्क साधून विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करणार - गहिनीनाथ महाराज औसेकर

पुरातत्व विभागाशी संपर्क साधून विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करणार – गहिनीनाथ महाराज औसेकर

Subscribe

सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीवर पुरातत्व वज्रलेप केला जात असतो. आतापर्यंत चार वेळा पुरात्तव विभागाकडून मूर्तींवर विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र, यावेळी केलेला वज्रलेप अत्यंत कमी कालावधीत निघू लागल्याने मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच भक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विठ्ठल रुक्मिणी मूर्ती झीजप्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार आहे. पुरातत्व विभागाशी संपर्क साधून विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करणार असल्याचं मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटलं आहे. आज चैत्र एकादशीची पूजा होती. त्यामुळे या पुजेसाठी मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिरात आले होते. त्यानंतर त्यांनी स्वत: या मूर्तींची पाहणी केली. तसेच त्यांनी हा सर्व प्रकार गांभीर्याने घेत पुरातत्व विभागाशी संपर्क साधून विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करणार असल्याचं गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मागील दोन वर्षांत देवाच्या पायावरील दर्शन पूर्णपणे बंद होते. याच कालावधीत २३ आणि २४ जुलै २०२० या कालावधीत पुरातत्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. यानंतर हा लेप पुढील ७ ते ८ वर्षे तसाच राहिल असा दावा करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षानंतर २ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा देवाच्या पायावरील दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागला आहे.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची वज्रलेपानंतर अल्पावधीतच झीज सुरु झाल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मान्य केले असून तातडीने पुरातत्व विभागाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही, अमेय खोपकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -