घरक्रीडाIPL 2022 DC vs PBKS : कोरोनाग्रस्त दिल्लीसमोर पंजाबच्या 'किंग्स'चे आव्हान, दोन्ही...

IPL 2022 DC vs PBKS : कोरोनाग्रस्त दिल्लीसमोर पंजाबच्या ‘किंग्स’चे आव्हान, दोन्ही संघाची विजयाच्या मार्गावर नजर

Subscribe

आयपीएलच्या ३२ व्या सामन्यात बुधवारी कोरोनाशी लढा देत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. सर्वांच्या नजरा दोन्ही संघांच्या ‘पॉवर हिटर’ खेळाडूंवर असतील. दिल्लीकडे डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंतसारखे आक्रमक खेळाडू आहेत तर पंजाबकडे शिखर धवन, फॉर्मात असलेला लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान आहेत. दोन्ही संघांच्या नजरा विजयाच्या मार्गावर परतण्यावर असतील आणि यामध्ये फलंदाज यशाची गुरुकिल्ली ठरतील.

पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अंगठ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र आता तो बरा होऊन संघात परतला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध धवन चांगल्या फॉर्ममध्ये होता पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. सनरायझर्सविरुद्ध तो धावा करू शकला नाही. आता मयंकसोबत पंजाबला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देण्यावर त्याचा भार असेल. तथापि, पंजाबच्या मधल्या फळीलाही अधिक जबाबदारीने खेळावे लागेल आणि धावा कराव्या लागतील. जितेश शर्माने एक चांगला फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे, पण लिव्हिंगस्टोन वगळता कोणीही सनरायझर्सविरुद्ध धावा करू शकला नाही. लिव्हिंगस्टोनने ३३ चेंडूत ६० धावा केल्या. पंजाबसाठी दिल्लीचे आव्हान सोप्पे नसेल कारण फॉर्मात असलेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत ११ बळी घेतले आहेत.

- Advertisement -

तसेच, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज खलील अहमदही धोकादायक ठरला आहे. दुसरीकडे, आरसीबीविरुद्ध ४८ धावा देणाऱ्या मुस्तफिजुर रहमानला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंजाबच्या गोलंदाजीची कमान कागिसो रबाडाच्या हाती असेल. त्यांच्याशिवाय वैभव अरोरा, अर्शदीप सिंग आणि राहुल चहरही चांगली कामगिरी करत आहेत. गोलंदाज अष्टपैलू ओडियन स्मिथला त्याच्या प्रतिभेला न्याय द्यावा लागेल. दिल्लीच्या संघात कोरोनाने शिरकाव केल्याने सामन्याचे ठिकाण बदलावे लागले. पुण्यात होणार सामना आज मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.


हेही वाचा : IPL 2022: एका चेंडूवर ‘इतक्या’ धावा; आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -