घरताज्या घडामोडीशिवसैनिकांच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल, खार पोलीस ताब्यात घेणार - वरुण...

शिवसैनिकांच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल, खार पोलीस ताब्यात घेणार – वरुण सरदेसाई

Subscribe

मातोश्रीबाहेर हनुमान चालीस पठण करणार असा इशारा राणा दाम्पत्याकडून देण्यात आला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या भूमिकेवरुन माघार घेत असल्याची घोषणा आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीच्या भावना दुखवल्यामुळे राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस राणा दाम्पत्याला ताब्यात घेण्यासाठी खार येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. राणा यांनी घाबरुन माघार घेतली असल्याचे शिवसैनिकांनी म्हटलं आहे. तसेच युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे.

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केलं आहे. वरुण सरदेसाई म्हणाले की, ज्याला आपण गौरवस्थान मानतो त्या मातोश्रीला आव्हान दिलं होते परंतु शिवसैनिकांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता, रात्रंदिवस न पाहता सकाळ आणि संध्याकाळ पहारा दिला. राणा दाम्पत्य राहत होते त्या ठिकाणीसुद्धा पहारा दिला. याचा परिणाम काय झाला तर मातोश्रीपर्यंत जाणे तर सोडा पण घराच्याबाहेरसुद्धा पडू शकले नाही. खरं तर ते काल येणार होते काल घाबरले पत्रकार परिषद घेतली. आज सकाळी ९ ची वेळ दिली होती. शिवसैनिक खार आणि मातोश्रीवर जमले होते. शेवटी तीन वाजता पत्रकार परिषद घेत सांगितले आमच्याकड़ून चूक झाली. त्यांनी मान्य केलंय की, शिवसेनेसोबत लढणं आम्हाला झेपणार नाही. त्यानंतर मातोश्रीबाहेर जमलेले शिवसैनिक खारला पोहचलो असे वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, शिवसैनिकांनी आणि शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी मागणी केली की, राणा दाम्पत्याने शिवसेनेची माफी मागावी किंवा मातोश्रीला डिवचण्याबद्दल राणा दाम्पत्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. यानंतर शिवसैनिकांनी कायदेशीर पद्धतीने गुन्हा नोंदवला आहे. आपल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कायदा सुव्यवस्था पाळण्यात मदत करायचे आहे. राणा दाम्पत्याला पोलीस घेऊन जाणार आहेत आणि ते पोलीस चौकीत टाकणार आहेत. पोलीस त्यांना घेऊन जात असताना. आपण सगळ्यांनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे असे आवाहन सरदेसाई यांनी केल आहे.

सरदेसाईंचा भाजपवर निशाणा

तुम्हाला माहिती आहे की, हे दोघे आपल्यासाठी किस झाड की पत्ती है, पण यांच्या आडून जे राजकारण करु पाहत आहेत. यांना तेच पाहिजे की, शिवसेनेकडून कायदा हातात घेतला पाहिजे मग ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतील. यामुळे आपल्याकडून कोणतीही चुकिची घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असे वरुण सरदेसाई म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राणा दाम्पत्याला अडवलं तर मी जाऊन बाहेर काढणार, बघतो कोण अडवतं; आता राणेंचं सेनेला चॅलेंज

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -