घरमहाराष्ट्रवकील गुणरत्न सदावर्तेंचं जेलमध्ये उपोषण

वकील गुणरत्न सदावर्तेंचं जेलमध्ये उपोषण

Subscribe

वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जेलमध्येच उपोषण सुरु केलं आहे. गुणरत्न सदावर्ते सधअया आर्थर रोड जेलमध्ये आहेत, तिथे त्यांनी जेवण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती सरकारी वकील अरुणा पै यांनी माहिती दिली.

सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून त्यांचं उपोषण सुरु आहे. मागिल १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नाही आहेत. सदावर्ते ज्या ज्या पोलीस ठाण्यात होते, तिथले पोलीस त्यांना जेवणासाठी विनंती करत होते. मात्र, सदावर्तेंनी जेवण करण्यास नकार देत सकाळी आणि सायंकाळी केवळ ज्यूस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंची कोठडी घेतली होती.

- Advertisement -

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळाला आहे. मात्र, इतर गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झालेली नाही. दरम्यान, सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. तथापि, पुण्यातील विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुणे पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्याकडे ताबा देण्यात आलेला नाही. पुढील कारवाई मुंबईतून होईल असं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -