घरताज्या घडामोडीप्रशांत किशोरने धुडकावली काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची ऑफर, ट्वीट करत दिली माहिती

प्रशांत किशोरने धुडकावली काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची ऑफर, ट्वीट करत दिली माहिती

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर धुडकावून लावली आहे. तसेच त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. प्रशांत किशोर काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होणार नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी सुद्धा ट्वीट करत दिली आहे.

काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडल्या होत्या. यामध्ये किशोर यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काही गोष्टींचे सादरीकरणही केले होते. त्यानंतर किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. मात्र, रणदीप सुरजेवाल यांच्या ट्वीटनंतर आणि प्रशांत किशोरने केलेल्या ट्विटनंतर यावर पूर्ण विराम लागला आहे. त्यामुळे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

मी EAG चा भाग म्हणून काँग्रेस पक्षात सहभागी होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नाकारली आहे. तसेच परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्वाची गरज असल्याचे प्रशांत किशोर यांनी ट्विटमधून म्हटले आहे.

- Advertisement -

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांनी स्वतः काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सहभागी करण्यावर विचार करण्यासाठी आणि २०२४ च्या मिशनचे त्यांचे प्रस्तावित व्हिजन पुढे नेण्यासाठी समितीची स्थापना केली होती. या १३ सदस्यीय समितीने आपला अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर केला होता. यासंदर्भात सोमवारी काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली होती. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सहभागी करण्याच्या बाजूने होते, मात्र दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी मोठा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.


हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाचा दिलासा, पुण्यातील तक्रारीसाठी अटकपूर्व जामीन मंजूर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -