घरमुंबईमंत्रालय पुन्हा गजबजणार, १८ मे पासून सर्वांसाठी प्रवेश खुला

मंत्रालय पुन्हा गजबजणार, १८ मे पासून सर्वांसाठी प्रवेश खुला

Subscribe

राज्याच्या ग्रामीण भागातून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी असंख्य सर्वसामान्य लोक शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी येतात. पण कोरोनामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात १६ मार्च २०२० पासून प्रवेश बंद करण्यात आला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून म्हणजे मार्च २०२० पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेला मंत्रालय प्रवेश आता १८ मे पासून खुला होत आहे. गुढीपाडव्यापासून  सर्व निर्बंध उठवल्यानंतर राज्य सरकारने मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असंख्य सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी असंख्य सर्वसामान्य लोक शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी येतात. पण कोरोनामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात १६ मार्च २०२० पासून प्रवेश बंद करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण मंत्रालयात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे शासकीय कामांसाठी येणा-यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा मंत्रालयात प्रवेश देण्याची मागणी जोर धरू लागली होती.

- Advertisement -

अखेर आता १८ मे पासून हा प्रवेश देण्याचा निर्णय गृह विभागाने सोमवारी  घेतला. त्यामुळे  मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्वी असलेली व्हिआरएमएस (व्हिजिटर पास मॅनेजमेंट सिस्टिम) पुन्हा लागू केली जाईल. मंत्रालयात प्रवेश नसल्यामुळे विविध प्रकारचे अर्ज मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावरच स्वीकारले जात होते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. पण आता थेट मंत्री कार्यालयात जाऊन निवेदन- अर्ज सादर करता येतील. त्यामुळे पुढील आठवड्यापासून मंत्रालय पुन्हा पूर्वीसारखे गजबजणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -