घरदेश-विदेशवेळेवर मटण न मिळाल्याने केली मुलीची हत्या

वेळेवर मटण न मिळाल्याने केली मुलीची हत्या

Subscribe

बिहारच्या शंभू लाल शर्माने त्याच्या ४ वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि रूग्णालयात मृत घोषित केल्यानंतर तेथून पळूण गेला.

बिहार मध्ये पूर्णिया जिल्ह्यात एका माणसाने आपल्या ४ वर्षाच्या एकुलत्या एक मुलीची हत्या केली. कारण काय तर त्याच्या बायकोने मटण बनवायला खूप वेळ लावला म्हणून. बुधवारी सायंकाळी बिहारची राजधानी पटनापासून सुमारे ३६० कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील अमोर पोलीस ठाण्याजवळील फकीरौली गावात ही घटना घडली.

पोलिसांची टीम गावाकडे गेली आणि ४० वर्षीय शंभू लाल शर्मा या आरोपीला अटक करण्यात आली. मुलीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पूर्णिया सदार रुग्णालयात दाखल केले गेले.

- Advertisement -

“ताब्यात घेण्या अगोदर आम्ही आरोपीची चौकशी केली. तो दुःखी होता”, असे आमोर पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) पंकज कुमार यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले.

त्याच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारावर शर्मा यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल केला गेला आहे. गुन्हेगार गुजरात मध्ये मजुरीची कामं करतो आणि छठ पूजेनिमित्त घरी परतला होता.

- Advertisement -

“त्याला मटणाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे बायकोने मटण बनवण्यात वेळ लावल्या कारणाने त्याचा राग अनावर होता. रागाच्या भरात तो त्याच्या ४ वर्षाच्या मुलीला मारहाण करू लागला. मुलगी शांत झाली आणि जमीनीवर बेशुध्द पडल्यावर त्याला त्याच्या कृत्याची जाणीव झाली”, असे पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

शर्माने आपल्या मुलीला आमोर रेफरल हॉस्पिटलमध्ये नेले जेथे तिला मृत घोषित करण्यात आले. तो स्वतःच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडून पळाला. पण पोलिसांनी त्याला शोधले आणि त्यांना आरोपीला अटक करण्यात यश आले.

स्थानिकांनी सांगितले की, मटण आणि दारूवर पैसे खर्च करू नको असे त्याची बायको त्याला नेहमी सांगायची. तर त्याने बर्याचदा पत्नीला देखील मारहाण केली होती.

बिहारमधली ही पहिली घटना नाही आहे. तेथील अररिया जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी एका माणसाने त्याच्या बायकोला मारहाण करूण तिला आग लावली होती. कारण काय होते तर तिने मटणात पुरेश्या प्रमाणात मीठ टाकले नव्हते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -