घरदेश-विदेशसीआरपीएफचा जवान शहीद

सीआरपीएफचा जवान शहीद

Subscribe

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तळावर ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला असून एका जवान जखमी झाला आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला आहे. पुलवामामधील काकापोला येथील सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आणि पळ काढला यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यानंतर परिसरामध्ये शोध मोहिम देखील राबवण्यात आली. या हल्ल्यामध्ये हेड कॉन्स्टेबल चंद्रिका प्रसाद हे जखमी झाले आहेत. दरम्यान, चंद्रिका प्रसाद यांना जवळच्या रूग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक देखील उडाली. जम्मू – काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत असून जवानांकडून देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. सध्या दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. रविवारी दहशतवाद्यांनी एका १७ वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केली आहे.

जम्मू – काश्मीरमधील पाच मुलांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. त्यापैकी दोघांना सोडून दिलं. तर दोन जण दहशतवातवाद्यांच्या ताब्यात आहेत. त्यापैकी एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी पोलिस अधिकारी आणि लष्कराच्या जवानांना घरामध्ये घुसून लक्ष्य केलं होतं. तसेच पत्रकारांना देखील दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. त्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये काहीसं अस्थिर वातावरण आहे. मात्र जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असून वर्षभरात लष्कराकडून २०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सरकारनं देखील लष्कराला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सीमेपलिकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून गुप्तचर विभागानं सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -