घरमहाराष्ट्रन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या - शिवसेना

न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना

Subscribe

पुढच्या काळात शांतता हवी असेल तर मराठा समाजाला तातडीने न्यायालयात टिकेल असे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज, सोमवारी विधानभवन परिसरात शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले. पुढच्या काळात शांतता हवी असेल तर मराठा समाजाला तातडीने न्यायालयात टिकेल असे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन केले.

वाचा : ‘आम्हालाही जल्लोषाची तारीख सांगा’; MIMची पोस्टरबाजी

- Advertisement -

वाचा : या मुद्द्यावर असेल विरोधी पक्षाचे लक्ष – राधाकृष्ण विखे पाटील

वाचा : माधवराव गायकवाड यांच्याकडे लक्ष दिले नाही; सरकारची दिलगिरी

- Advertisement -

राजेश क्षीरसागर, सुजीत मिनचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, प्रकाश अंबिटकर यांनी या मागणीसाठी घोषणा देत आंदोलनात सहभाग घेतला. मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले, पण आरक्षण मिळाले नाही. न्यायालयाचे आणि मागासवर्ग आयोगाचे कारण देत मराठा समाजाचा फुटबॉल करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -