घरदेश-विदेशगिलगिट-बाल्टिस्तान विकून PAK ने चीनकडून घेतले मोठे कर्ज, POK सुद्धा ठेवू शकतो...

गिलगिट-बाल्टिस्तान विकून PAK ने चीनकडून घेतले मोठे कर्ज, POK सुद्धा ठेवू शकतो गहाण

Subscribe

अनेक देशांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यानंतरही पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन कर्ज घेत आहे.

भारताचे शेजारी देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती बिकट आहे. अनेक देशांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यानंतरही पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन कर्ज घेत आहे. चायना टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आपला मित्र देश चीनकडून 19 हजार कोटी रुपयांचे नवीन कर्ज घेणार आहे. त्या बदल्यात गिलगिट आणि बाल्टिस्तानचा भाग चीनच्या ताब्यात द्यावा लागेल. आपली ढासळलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.

पाकिस्तानचा परकीय चलना साठी होतोय कमी –
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून पाकिस्तानला ९० हजार कोटी रुपये मिळण्याची आशा नाही. अशा परिस्थितीत आता पाकिस्तान आपली सरकारी मालमत्ता आणि क्षेत्र गहाण ठेवत आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान आपल्या व्याप्त काश्मीर (पीओके) चा भाग चीनच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पीओकेचे 52 कायदे ताब्यात घेतले –
पाकिस्तानने गिलगिट, बाल्टिस्तान आणि पीओकेचे 52 कायदे ताब्यात घेतले आहेत. याअंतर्गत पाकिस्तान सरकारला तेथील जमीन कोणत्याही देशाला भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार मिळाला आहे. 2018 मध्ये, पाकिस्तान सरकारने गिलगिट, बाल्टिस्तान आणि पीओकेला अधिक अधिकार देण्याची घोषणा केली होती. गिलगिट आणि बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री खालिद खुर्शीद खान यांनीही पाकिस्तान सरकारने 30 अब्ज रुपयांची मदत कमी करून केवळ 12 अब्ज रुपयांवर आणल्याचा आरोप केला आहे.

लगिट-बाल्टिस्तानमधील हुंजा परिसरात निओबिमचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन –

- Advertisement -

कर्जाच्या मोबदल्यात चीन पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील हुंजा परिसरातून निओबिमचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करत आहे. हुंजामध्ये 120 लाख मेट्रिक टन माणिक-मोती आणि कोळशाचा साठा आहे. चीनला हुंजामध्ये मोठी जमीन लीजवर मिळाली आहे. अलीकडेच येथील स्थानिक लोकांनी चीनला भाडेपट्टी देण्याच्या विरोधात जोरदार आंदोलनही केले होते.

चीन व्यतिरिक्त पाकिस्तानने UAE (संयुक्त अरब अमिराती) कडूनही मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. आता आणखी ८ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. यासाठी ते 20 सरकारी कंपन्यांचे 12% पेक्षा जास्त शेअर UAE ला देणार आहेत. पाकिस्तानने 2018 पासून सौदी अरेबियाकडून 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. फेब्रुवारीमध्येच सौदी अरेबियाने पाकिस्तानला 10 हजार कोटींचे कर्ज दिले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -