घरमहाराष्ट्रसायन रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण

सायन रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण

Subscribe

रक्तदाब, मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे निदान वेळीच करण्यासाठी व रुग्णांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या विविध रुग्णालयांमध्ये मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

रक्तदाब, मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे निदान वेळच्यावेळी झाल्यास त्यावर अधिक परिणामकारक उपचार करणे शक्य होते. नागरिकांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी केले आहे. रक्तदाब, मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे निदान वेळीच करण्यासाठी व रुग्णांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या विविध रुग्णालयांमध्ये मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (Inauguration of Diabetes and Blood Pressure Testing Center at Sion Hospital)

मंगळवारी सायन रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणी कक्षात पहिले ‘मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र’ नागरिकांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातील आरोग्य सुविधांचा संबंधितांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

- Advertisement -

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी स्वतः अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची रक्तदाब चाचणी केली. या कक्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात नोंदणीसाठी येणारे रुग्ण, रुग्णांसोबत येणारे नातेवाईक आणि नागरिक देखील रक्तदाब व मधुमेह चाचण्या करवून घेऊ शकतील. तसेच आवश्यकतेनुसार या कक्षाची चाचणी क्षमता वाढविली जाऊ शकेल, अशी माहिती पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी यावेळी दिली.

आणखी १५ केंद्र कार्यान्वित करण्यात येणार

- Advertisement -

संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शहा यांनी, आजपासून कार्यान्वित करण्यात आलेले मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र हे सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधी दरम्यान नागरिकांच्या सेवेत कार्यरत असेल. तर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत हा कक्ष सुरु असणार आहे. या कक्षामध्ये रक्तदाब व मधुमेह चाचण्या मोफत असणार आहेत, असे सांगितले. त्याचप्रमाणे, महापालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये इत्यादी ठिकाणीही अशाप्रकारचे आणखी १५ केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी, उप आयुक्त संजय कु-हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. निलम आंद्रादे, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, के. ई. एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. विद्या ठाकूर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, संयुक्त कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा, ताज ग्रुप ऑफ हॉटेलचे (द इंडियन हॉटेल कंपनी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. पुनीत छटवाल व उपाध्यक्ष गौरव पोखरियाल, ब्रेस्ट-फिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (महाराष्ट्र) च्या डॉ. मंगला वाणी व डॉ. प्रशांत गांगल, मुंबई ब्रेस्ट-फिडिंग समितीच्या डॉ. सुजाता कान्हेरे, शीव रुग्णालयाचे समुदाय विकास अधिकारी प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा – १०-१२ कि.मी. पायपीट करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे सायकलची भेट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -