घरमहाराष्ट्रसोलापुरात ५० ठिकाणी बसवणार ‘ई-टाॅयलेट’

सोलापुरात ५० ठिकाणी बसवणार ‘ई-टाॅयलेट’

Subscribe

सोलापूर महापालिकेने १४ व्या वित्त आयोगातून शहरात ५० ठिकाणी ई टाॅयलेट बसवणार आहे. यामुळे लोकांची गैरसोय होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात विविध ठिकाणी ई टाॅयलेट बसवण्यात येणार आहे. त्यापैकी १६ ई टाॅयलेटची निविदा महापालिकेने काढली. शहरात एकीकडे मुतारी पाडल्या जात असताना शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना लघुशंका करण्यास अडचण येत आहे. तीन ते चार तास प्रवास करून बस स्थानकात उतरल्यावर सोय नसल्याने रस्त्यावर अस्वच्छता केली जाते. मुळात महिलांसाठी अडचण ठरत आहे. त्यावर हा उपाय करण्यात येत आहे. बसस्थानक परिसरात पुरेशी आणि सोयीच्या जागी मुतारी नसल्याने रस्त्यावर अस्वच्छता होत आहे. त्यामुळे बस स्थानकास महापालिका नोटीस देणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेगळे-पाटील यांनी दिली.

शहरात मुतारी नाही

शहरात मुतारी नाहीत, असलेल्या मुतारी पाडकाम करण्याचा प्रशासनाकडून प्रस्ताव येत आहेत. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, पूर्व भागासह अनेक ठिकाणची मुतारी महापालिकेने किंवा त्या परिसरात ठरावीक लोकांनी ठरवून तांत्रिक पद्धतीने गायब केल्या. बाजार पेठ परिसरात मुतारी असली पाहिजे. यासाठी महापालिका सभागृहात नगरसेवक आनंद चंदनशिवे, जावेद खैरादी, गुरुशांत धुत्तरगावकर, किसन जाधव, प्रा. नारायण बनसोडे, प्रभाकर जामगुंडे यांनी मत व्यक्त केले.

- Advertisement -

५० ठिकाणी ई टॉयलेट बसवणार

महापालिकेने १४ व्या वित्त आयोगातून शहरात ५० ठिकाणी ई टाॅयलेट बसवणार आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीकडून १० टाॅयलेट बसवण्यात आले. नव्या बसवण्यात येणारे टाॅयलेट हे विजापूर रोड शासकीय मैदान, हत्तुरेवस्ती, विजापूर रोड, जुळे सोलापूर, नई जिंदगीसह शहराच्या मुख्य बाजारपेठ, उद्यान परिसरात बसवण्यात येणार आहे. १६ टाॅयलेटची निविदा सोमवारी काढण्यात आली. दोन ते तीन महिन्यात हे टाॅयलेट बसतील. अन्य ३४ टाॅयलेट गरजेनुसार शहरात इतर ठिकाणी बसवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -