घरमुंबईमुंबईत घरखरेदी करताय; तर ही बातमी नक्की वाचा

मुंबईत घरखरेदी करताय; तर ही बातमी नक्की वाचा

Subscribe

मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्टॅम्प ड्युटी ६ टक्क्यांवरून ७ टक्के होणार आहे.

मुंबईमध्ये हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून हक्काचे घर खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो. मात्र आता मुंबईत घरखरेदी महागणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक मंगळवार, २७ नोव्हेंबर रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता स्टॅम्प ड्युटी ६ टक्क्यांवरून ७ टक्के होणार आहे. मंगळवारी विरोधकांच्या गोंधळातच मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आले. हे विधेयक मंजुर झाल्यामुळे मुंबईतील घरखरेदी महागणार आहे.

घरांच्या स्टॅप ड्युटीमध्ये १ टक्क्याची वाढ

विधेयक मंजुर झाल्यामुळे घरांच्या स्टॅप ड्युटीमध्ये १ टक्क्याची वाढ होणार असून, ती आता ६ टक्क्यांवरून ७ टक्के इतकी होणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी म्हणजेच मेट्रो, मोनोरेल, जलद बससेवा आदी सेवांच्या विकासासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे घरांची विक्री, दान आणि गहाण ठेवण्यात येणाऱ्या स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ होणार आहे. नोटबंदीनंतर बांधकाम व्यावसायात मंदी आली होती. अशा परिस्थितीत स्टॅम्प ड्युटीमध्येही वाढ होणार असल्याने पुन्हा एकदा घर खरेदी-विक्री व्यवसायाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

घर खरेदी-विक्री महागणार

घर खरेदी – विक्री, भाडेतत्वावरील करार, बक्षीसपात्र करारनामा, गहाण ठेवण्यात आलेली कागदपत्रे आदी बाबींसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मुंबई महानगरपालिका कायदा २०१८ मध्ये स्थावर मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटीचा दर ठरवण्यासाठी दुसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोनो, मेट्रो यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या महानगरात राबवले जात आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून घेतला जाणारा वाढीव स्टॅम्प ड्युटीचा दर हा अशाच प्रकल्पांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -