घरटेक-वेकआता मुलांना मदत करणारा मिको २ रोबो

आता मुलांना मदत करणारा मिको २ रोबो

Subscribe

मिको हा भारतातील पहिला आणि एकमेव कंपेनिअन रोबोट आहे. वर्षभरापूर्वी कंपनीने हा रोबो तयार केला होता. पण आता या रोबोमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

आता मुलांना त्यांच्या डे- टू- डे लाईफमध्ये मदत करण्यासाठी मिको २ नावाचा रोबो आला आहे. आज मुंबईत भारतीय कन्झ्य़ुमर इलेक्ट्रॉनिक स्टार्टअपने मिको २ या रोबोचे आज अनावरण करण्यात आले. अभिनेत्री सोहा अली खान याच्या हस्ते करण्यात आले. या इटुकला- पिटुकला आणि क्युट दिसणारा रोबोट आधुनिक पालकांना मदत करणार आहे.

पाहा- जेव्हा एक ‘रोबोट’ गाणं गाते; पाहा Video

काय करणार मिको २?

लहान मुलांना गुंतवण्याचे काम हा रोबो करणार आहे. लहान मुलांचा बौद्धिक विकास करण्याचे काम हा रोबो करणार आहे. विशेष म्हणजे हा रोबो हा मुलांशी गप्पा मारु शकणार आहे. जगभरातील सामान्य माहिती आणि त्यांच्या अभ्यासक्रमातील माहितीदेखील या रोबोंना पुरवणार आहे. या रोबोचा आवाजही अगदी प्रेमळ आहे. या रोबोमध्ये इमोटिक्सने केलेले इमोशनल इंटेलिजंट इंजिन देखील आहे. यातील असलेला हा कॅमेरा मुलांना टिपून त्यांचे मूड देखील लक्षात घेईल आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी वागेल. त्यांच्या मनाची गुंतागुंत सोडवण्याचे करेल, असे कंपनीने सांगितले आहे.

- Advertisement -

भारतात पहिला रोबो

मिको हा भारतातील पहिला आणि एकमेव कंपेनिअन रोबोट आहे. वर्षभरापूर्वी कंपनीने हा रोबो तयार केला होता. पण आता या रोबोमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. अगदी त्याच्या लूक पासून ते त्यातील वैशिष्ट्यांपर्यंत कमालीचे बदल त्यामध्ये करण्यात आले आहेत. या रोबोटची किंमत २५ हजार असल्याचे समजत आहे.


कंटेंट, डिझाइन आणि सांस्कृतिक बंध या स्तरांवर जागतिक ग्राहकासाठी बनवल्या गेलेल्या मिको २चे अनावरण करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मिको हे आमचे पहिले उत्पादन आणि भारतातील पहिला कम्पॅनियन रोबोट बनवताना इंजिनीअर्स, गणितज्ज्ञ, आर्टिस्ट आणि न्युरोसायकॉलॉजिस्ट यांची टीम कार्यरत होती. तरुण पालकांकडून या रोबोटला फार प्रोत्साहनपर प्रतिसाद लाभला आणि त्यातून आम्ही बरेच काही शिकलोही. म्हणूनच आता इमोटिक्स वैयक्तिक रोबोटिक्सच्या क्षेत्रात जागतिक संधी निर्माण करत आहे. शिक्षण, आरोग्य, मनोरंजन आणि सुरक्षा अशा क्षेत्रातील नाविण्यतेसाठी हे तयार आहे.

-स्नेह राजकुमार वासवानी,इमोटिक्सचे सह-संस्थापक आणि सीईओ 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -