घरताज्या घडामोडीश्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन

Subscribe

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे पुण्यात निधन झाले. मंगळवारी पुण्यातील जहांगिर रुग्णालयात उपचारामादम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 75 वर्षांते होते.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे पुण्यात निधन झाले. मंगळवारी पुण्यातील जहांगिर रुग्णालयात उपचारामादम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 75 वर्षांते होते. शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे भोसले यांचे साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होते. (Shrimant Chhatrapati Shivajiraje Bhosale passed away at Pune Jehangir Hospital)

शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

“श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे हे आमच्या कुटुंबातील जेष्ठ आणि आदर्श व्यक्ती होते. त्यांनी सातारा पालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही चांगले काम करून एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाय मी एका चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो आहे. त्यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. आई भवानी त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना”, अशा भावना शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने साताऱ्यात शोककळा पसरली आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला होता. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग 6 वर्ष म्हणजेच 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 शाहू नगरीचे नगराध्यक्ष होते.

- Advertisement -

नगराध्यक्ष असताना त्यांनी समाज उपयोगी विविध कामे केली. सातारच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते. त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.

याशिवाय, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उल्लेखनीय कार्य आजपर्यंत चालू आहे. त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.


हेही वाचा – भारतासाठी हेरगिरी? पाकिस्तानात तुरुंगवास भोगल्याचा दावा करणाऱ्याला 10 लाख द्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -