घरमुंबईफायनान्स कंपनीच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

फायनान्स कंपनीच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

Subscribe

फायनान्स कंपनीच्या नावानं वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका ७० वर्षिय व्यक्तीला मुंबई क्राईम ब्रॉचनं वरळीतून बेड्या ठोकल्या आहेत. रमणिक पटेल असं या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे.

कुणाचं डोकं कसं आणि कुठं चालेल याचा काही नेम नाही. मुंबईमध्ये देखील अशाच एका नमुन्याला पोलिसांनी अटक केली आहे. फायनान्स कंपनीच्या नावानं वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका ७० वर्षिय व्यक्तीला मुंबई क्राईम ब्रॉचनं वरळीतून बेड्या ठोकल्या आहेत. रमणिक पटेल असं या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी दोन महिलांसह एक अल्पवयीन मुलगी, काही मुलींचे फोटो ताब्यात घेतले आहे. गजलक्ष्मी फायनान्स नावानं रमणिक पटेलनं कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या आडून रमणिक हा काळा धंदा चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस इन्स्पेक्टर प्रभा राऊळ यांना रेड टाकली आणि रमणिकच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला.

ज्यावेळी पोलिसांनी रेड टाकली त्यावेळी समोर असलेलं चित्र पाहून पोलिस देखील काही काळ हादरून गेले. बाहेर गजलक्ष्मी फायनान्स कंपनी असा बोर्ड लावलेला असला तरी आतमध्ये मात्र बेड होते. कंपनीमध्ये असणारं सामान कुठेचं नव्हतं. यावेळी पोलिसांनी दोन महिलांसह एक अल्पवयीन मुलगी, काही मुलींचे फोटो ताब्यात घेतले.

- Advertisement -

व्हॉट्सअॅपवरून व्हायचा व्यवहार

रमणिकनं अत्यंत हुशारीनं हा धंदा चालवला होता. रमिणक व्हॉट्सअॅपवरून गिऱ्हाईकांशी संपर्क साधायचा. त्यांना व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटो पाठवायचा. यावेळी रमिणकच्या मोबाईलमधून देखील काही फोटो ताब्यात घेतले गेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून हा धंदा सुरू असल्याची माहिती आता चौकशीतून समोर येत आहे. तसेच आम्हाला जबरदस्तीनं या धंद्यात आणलं गेलं अशी माहिती ताब्यात घेतल्या गेलेल्या मुलींनी चौकशी दरम्यान दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -