घरमहाराष्ट्रपती-पत्नीचा घटस्फोट; कन्याकुमारीहून मुलाचा ताबा थेट पत्नीला

पती-पत्नीचा घटस्फोट; कन्याकुमारीहून मुलाचा ताबा थेट पत्नीला

Subscribe

नवरा - बायकोच्या भांडणानंतर अखेर न्यायालयाने मुलांचा ताबा आईकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली येथे पाटील हे कुटुंब राहत होते. काही कारणांवरुन पाटील कुटुंबातील नवरा – बायको यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. हे वाद मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर या दोघांनी वेगवेगळ राहण्याचा प्रयत्न केला. काही दिवसानंतर त्यांचा घटस्फोट झाला. नवरा – बायको दोघही वेगळे झाले. मात्र त्यानंतर मुलांना कुठे ठेवायचे हा प्रश्न पडला. मात्र याबाबत आईने न्यायालयात आपला मुलगा मला हवा अशी मागणी केली आणि अखेर न्यायालयाने मुलांचा ताबा आईला द्यावा असा आदेश पारीत केला.

नेमके काय घडले?

सांगली येथे पाटील हे कुटुंब राहत आहे. सोनाली पाटील यांचा विवाह सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पाडळी येथील महेश अर्जुन पाटील यांच्याशी झाला होता. विवाहानंतर ते अर्जून शेठ असरीमद वदक तेरू मिनाक्षीपूरम येथ रहात होते. सोनाली आणि महेश या दोघांचा वाद झाल्यानंतर सोनाली पाटील त्यांच्या माहेरी खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथे निघून गेल्या. मात्र त्यांची मुले कन्याकुमारी येथे राहत होती. आई वडील विभक्त झाल्यावर खरा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांच्या ताब्याचा. दोघांनाही त्यांचा ताबा हवा असतो. त्यांची मुले कन्याकुमारी येथे होती. मुलांचा ताबा मिळावा यासाठी सोनाली पाटील यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विटा यांच्याकडे खटला दाखल केला होता. अखेर न्यायालयाने मुलांचा ताबा आईला द्यावा असा आदेश पारीत करण्यात आला आणि त्यानुसार मुलाचा ताबा आईकडे देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -