घरपालघरबोट चोरून पळालेला खलाशी बोटीसह ताब्यात

बोट चोरून पळालेला खलाशी बोटीसह ताब्यात

Subscribe

बोट गायब झाली. त्यावेळी त्यावर विकास नावाचा खलाशी झोपला होता. तोसुद्धा गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले.

वसईः वसईच्या पाचूबंदर बंदरातून बोट घेऊन पसार झालेल्या खलाशाला श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरात बोटीसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसई -पाचूबंदर येथील पीटर पेट्र् डांबर यांच्या मालकीची सावपेडू नावाची बोट पाचूबंदर समुद्रकिनार्‍यावर नांगरुन ठेवली होती. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बोट जागेवर होती. मात्र त्यानंतर अचानक बोट गायब झाली. बोट गायब झाली. त्यावेळी त्यावर विकास नावाचा खलाशी झोपला होता. तोसुद्धा गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले.

बोट गायब झाल्याचा प्रकार मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना माहिती देऊन सहकार्य मागितले असता त्यांनी याबाबत असमर्थता दर्शवली. माजी नगरसेवक व्हेलेन्टाईन मिरची यांनी बोट मालक, कुटुंबाला आधार देत वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. वसई पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे तसेच कोस्ट गार्डचे अधिकारी बी. के. सिंग यांना व्हेलेन्टाईन मिरची यांनी माहिती देऊन समुद्रात प्रत्यक्ष शोध मोहिम राबवण्यात आली. दुपारी २ वाजता सुरु झालेल्या मोहिमेत वसई पोलिसांचे पथक, कस्टम अधिकारी सामिल झाले होते. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत बोटीचा तपास लागला नाही. सदर बोट कुलाबा, श्रीवर्धन बाजूला गेल्याचा मच्छीमारांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्यानंतर पोलीस आणि कस्टम अधिकार्‍यांनी सर्वच किनारपट्टीवर माहिती दिली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दिघी बंदरात बोटीसह विकासही हाती लागला. दिघी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विकासला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -