घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार ६ नोव्हेंबर ते शनिवार १२ नोव्हेंबर २०२२

राशीभविष्य रविवार ६ नोव्हेंबर ते शनिवार १२ नोव्हेंबर २०२२

Subscribe

मेष ः- या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. गुरू लाभ होईल. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात चांगले निर्णय घेता येतील. विरुद्धलिंगी, गोड बोलणारी व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते. सावध रहा. खाण्याची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात सुधारणा करता येईल. ठाम निर्णय घेता येईल. बेकारांना नोकरी मिळेल. घरातील तणाव जास्त वाढू देऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. काम यशस्वी कराल. कोर्ट केसमध्ये सल्ला घेऊन वागा. शिक्षणात आळस नको. प्रगती करता येईल. शुभ दि. ६, ८

वृषभ ः या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. गुरू ग्रहाचे सहाय्य कमी मिळेल. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात समस्या येईल. सहनशीलता ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका. नोकरीत तणाव राहील. घरगुती कामे करता येतील. राजकीय-सामाजिक कार्यात चूक होईल. बोलताना काळजी घ्या. प्रकरण तापेल. कोर्ट केस किचकट होईल. कामात तुमचा अंदाज चुकू शकतो. वरिष्ठांचा दबाव राहील. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत घ्या. शिक्षणात चांगली संगत ठेवा. शुभ दि. ७, ९

- Advertisement -

मिथुन ः- या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. गुरू बल चांगले लाभकर आहे. जीवनात चांगल्या, मनासारख्या घटना घडतील. वेळेला व प्रयत्नांना महत्त्व द्या. धंद्यात जम बसेल. अति गोड बोलणार्‍या माणसांपासून सावध रहा. मैत्री जपून ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मान-सन्मान वाढवता येईल. नोकरीत बदल करता येईल. काम यशस्वी कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला दुखापत संभवते. सावध रहा. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. शिक्षणात यश मिळेल. शुभ दि. ८, १०

कर्क ः- या सप्ताहात गुरू ग्रह धनु राशीत प्रवेश करीत आहे. घाई गर्दीत कोणताही निर्णय कुठेही घेऊ नका. नोकरी टिकवा. धंद्यात संधी मिळेल. कष्ट घ्या. वरवरचा फायदा न बघता मोठे काम करा. व्यवहारात कायदा पाळा. राजकीय-सामाजिक कार्यात वेळेला महत्त्व द्या. अरेरावी नको. लोकांच्या वृत्तीचा अभ्यास करा. कोर्ट केस संपवा. योग्य मुद्दे मांडा. कामात धावपळ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ओळखी होतील. शिक्षणात टिकून रहा. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. ९, ११

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. गुरू बल उत्तम राहील. तूळ राशीत बुध वक्री होत आहे. हा आठवडा थोडा तणावाचा वाटेल. घरात समस्या येईल. संयम ठेवा. धंद्यात वाढ होईल. नोकरीत काम वाढले तरी प्रभाव राहील. राजकीय सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. वाटाघाटीत तणाव होईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. नवीन ओळखी होतील. काम कठीण असेल. यश मात्र मिळेल. कोर्ट केसमध्ये दगदग होईल. शिक्षणात आळस करू नका. प्रगती कराल. घर, वाहन खरेदीची घाई नको. शुभ दि. १०, १२

कन्या ः- या सप्ताहात धनु राशीत गुरू ग्रह प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. ओळखी वाढतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. लोकांची मदत मिळेल. कायद्याचे पालन करून कोणताही निर्णय घ्या. रागावर ताबा ठेवा. नोकरीत चांगला बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन मित्र मिळतील. काम यशस्वी करता येईल. कोर्ट केसमध्ये प्रगती कराल. नोकरीत बदल करू शकाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. ०८, ११

तूळ ः- या सप्ताहात धनु राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्याला चांगली कलाटणी मिळेल. मोठे काम मिळेल. वेळ कमी पडेल. नियोजन नीट करा. मागील येणे वसूल करा. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विवाहासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. पद मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. नवीन ओळखी होतील. कामात दगदग होईल. शिक्षणात मनाप्रमाणे यश मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. प्रवासात घाई करू नका. शुभ दि. ७,१०

वृश्चिक ः- साडेसाती संपण्याच्या मार्गावर आहे. या सप्ताहात धनु राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात चिंता वाटेल. चिडचिड होईल. ओळखीचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. नम्र रहा. मार्ग मिळण्यास थोडा वेळ लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याकडून एखादी चूक होईल. त्यावर टीका होईल. धोरण घातक ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्या. घरातील कामे वाढतील. आपसात वाद होईल. काम जिद्दीने पूर्ण कराल. शिक्षणात आळस नको. खाण्याची काळजी घ्या. शुभ दि. ६,१२

धनु ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळवता येईल. भागीदारांच्या बरोबर तडजोड करावी लागेल. कालांतराने तुम्हाला अधिक प्रगती करता येईल. गुरू बल लाभेल. विवाहासाठी स्थळे मिळतील. नोकरीत बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिक वेगाने पुढे जाता येईल. पद मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. मोह आवरा. काम फत्ते कराल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शिक्षण होईल. चांगली संगत ठेवा. शुभ दि. ८,९

मकर ः- साडेसातीचे पर्व सुरू आहे. धनु राशीत गुरू ग्रहाचा प्रवेश होत आहे. गुरू बल कमी मिळेल. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात काम मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवण्यासाठी योजनांची मांडणी करा. काम करत रहा. प्रतिमा उजळत ठेवावी लागेल. अरेरावी नको, लोकांच्या समस्येसाठी प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. शिक्षणात आळस नको. व्यसन नको. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. ७, ८

कुंभ ः- या सप्ताहात धनु राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. तुळेत बुध प्रवेश करीत आहे. गुरू बल राहील. तुमच्या क्षेत्रात तुम्ही मनाप्रमाणे प्रगती करू शकाल. धंद्याला नवे वळण मिळेल. फायदा होईल. गुंतवणूक योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा उजळेल. योजनांना गती मिळेल. अधिकार मिळेल. घरात सुखद समाचार मिळेल. विवाहासाठी स्थळे मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. काम फत्ते होईल. शिक्षणात, कोर्ट केसमध्ये यश मिळेल. नोकरी लागेल. शुभ दि. ६, ७

मीन ः- या सप्ताहात धनु राशीत गुरू ग्रहाचा प्रवेश होत आहे. गुरू बल लाभेल. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात कष्ट पडतील. वाद वाढवू नका. धंदा मिळवा. नोकरीत काम जास्त असेल. नम्रता ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. चुकीचे वाक्य बोलले गेल्यास विरोध वाढेल. प्रतिष्ठा टिकवा. कला-क्रीडा क्षेत्रात टिकून रहा. कोर्ट केस महत्त्वाची ठरेल. सहनशीलता ठेवा. काम कठीण असेल. मोह ठेऊ नका. शिक्षणात अरेरावी नको. वृद्धांना दुखवू नका. त्यांची काळजी घ्या. शुभ दि. ७, ११

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -