दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत असताना आता आणखीन एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. ताडदेवमध्ये एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पालकांनी ताडेव पोलीस ठाण्यात तक्रार करताच ताडदेव पोलिसांनी त्या तीन नराधमांवर गुन्हा दाखल करुन त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
शिक्षिकेमुळे घटना उघडकीस आली
ताडदेवमधील एका सोसायटीमध्ये दहा वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते. या कुटुंबाच्या शेजारी त्या मुलीचा चुलत भाऊ राहतो. या भावाने पिडितीला टीव्ही दाखविण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला आणि त्या मुलीवर त्यांनी लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास त्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या तरुणीने याबाबत कोणाला काहीच न सांगता होणाऱ्या अत्याचाराला निमूटपणे सहन करत राहिली. याबाबत त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला ही घटना कळली. त्यानंतर त्या तरुणाने आणि एका पन्नास वर्षाच्या एका इसमानेही गैरफायदा घेत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. ३ डिसेंबपर रोजी शाळेत या मुलीच्या पोटात दुखायला लागले. वारंवार असह्य पोटदुखीने हैराण होणाऱ्या विद्यार्थीनीला शिक्षिकेने विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी या तरुणीने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार शिक्षिकेला सांगितला. शिक्षिकेने स्वयंसेवी संस्थेची मदत घेत ही सर्व माहिती आधी तिच्या पालकांना आणि नंतर पोलिसांना दिली. पालकांनी तक्राक करताच पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. मात्र सतत होणाऱ्या लैंगिक अत्याचारामुळे या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. तसेच शारीरिक त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाचा – काँग्रेस महिला कार्यकर्त्याला मिळाली सामूहिक बलात्काराची धमकी
वाचा – आयसीयूमधील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार