घरदेश-विदेशभयंकर- पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेची हत्या, शिरच्छेद करत स्तनही कापले

भयंकर- पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेची हत्या, शिरच्छेद करत स्तनही कापले

Subscribe

एका चाळीस वर्षीय हिंदू महिलेचे स्तन कापण्यात आले असून तिच्या शरीरावरची कातडी सोलून तिचा शिरच्छेद करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात मानवतेला काळीमा फासणारी भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. एका चाळीस वर्षीय हिंदू महिलेचे स्तन कापण्यात आले असून तिच्या शरीरावरची कातडी सोलून तिचा शिरच्छेद करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पाकिस्तानमधील हिंदू महिला खासदार कृष्णा कुमारी यांनी ही माहिती दिली आहे. दया असे या मृत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

कृष्णा कुमारी यांनी टि्वटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यात ४० वर्षीय विधवा महिला दया हीची निघृण हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शीर वेगळे झालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह बुधवारी शेतात सापडला असून रानटी लोकांनी तिचे स्तनही कापले आणि तिच्या डोक्यावरचे मांसही काढले आहे. मी तिच्या गावाला भेट दिल्याचे कृष्णा कुमारी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. कृष्णा कुमारी या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांनी पोलीस याप्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -