घरमहाराष्ट्र'अंगणवाडी'च्या 'अंगणात' ८ लाख बोगस लाभार्थी

‘अंगणवाडी’च्या ‘अंगणात’ ८ लाख बोगस लाभार्थी

Subscribe

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये किमान ८ लाख बनावट लाभार्थी असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

महाराष्ट्रातील अंगणवाड्यांसंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये किमान ८ लाख बनावट लाभार्थी असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यामध्ये जवळपास लाखाहून देखील अधिक अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये तब्बल ८ लाख बनावट लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यामधील अंगणवाड्यांमध्ये एकूण ६१ लाख लाभार्थी आहेत. पण यातील बोगस लाभार्थ्यांची संख्या ही ८ लाख आहे. आधार कार्डशी जोडले गेल्यानं या लाभार्थ्यांचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, या लाभार्थ्यांना हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.  प्रत्येक मुलासाठी केंद्र सरकार दिवसाला ४.८ रुपये आणि राज्य सरकार ३.२ रुपये अनुदान देतं. यावरून साऱ्या गोष्टी लक्षात येतात.

देशात सारखीच स्थिती

यापूर्वी आसामध्ये देखील १४ लाख लाभार्थी बोगस आढळून आले होते. यानंतर बोगस लाभार्थ्यांच्या विरोधात शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील १४ लाख लाभार्थी हे बनावट आढळले आहेत. दरम्यान, मुलांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्य पुरवठ्यात अनेक त्रुटीही असल्याचं महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मान्य केलं आहे. त्यानंतर राज्य सरकारनं देखील याची तपासणी करावी अशी सुचना मंत्रालयानं दिली आहे. देशभरात आत्तापर्यत १ कोटीपेक्षा देखील जास्त लाभार्थ्यांना हटवलं गेलं अशी माहिती मनेका गांधी सप्टेंबरमध्ये दिली होती. त्यामुळे हा आकडा आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -