घरताज्या घडामोडीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे गुवाहाटीत इमर्जन्सी लँडिंग

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे गुवाहाटीत इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची घटना घडली. बुधवारी रात्री गुवाहाटीत अमित शाह यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगरतळा येथे जात होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची घटना घडली. बुधवारी रात्री गुवाहाटीत (Guwahati) अमित शाह यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगरतळा येथे जात होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या विमानाचे गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. (Bjp Leader Amit Shah Plane Emergency Landing At Guwahati Agartala)

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे लँडिंग करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगरतळा येथे जात होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या लँडिंगनंतर त्यांनी कालची रात्र गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे राहणे पसंत केले.

- Advertisement -

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आगरतळा दौऱ्यावर जात आहेत. भाजपाने त्रिपुरात रथयात्रेचे आयोजन केले आहे. याच रथयात्रेचे उद्घाटन करण्यासाठी अमित शाह गुरुवारी सकाळी आगरतळाला रवाना होणार आहेत. अमित शाह आज त्रिपुरात भाजपच्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेला त्या दिवशी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून सुरुवात होणार आहे.

अमित शहा यांचे रात्री उशिरा गुवाहाटीच्या एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वागत केले.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवार रात्री त्रिपुराला जाणार होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आता कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.

अमित शाह दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम येथील रॅलीतही सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या रथयात्रेला ‘जनविश्वास यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा १२ जानेवारी रोजी यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी जनविश्वास यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

त्रिपुरा भाजपाचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्य म्हणाले की, ‘जनविश्वास यात्रे’ दरम्यान पक्षाला सुमारे 10 लाख लोकांशी जोडले जाण्याची अपेक्षा आहे. यामध्ये राज्यातील सर्व 60 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. केंद्र आणि राज्य सरकारचे कल्याणकारी उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 200 रॅली आणि 100 हून अधिक मिरवणुका काढल्या जाणार आहेत. 2018 पासून भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांचे प्रदर्शन हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या बालेकिल्ल्यात दशके जुन्या सीपीआय सरकारचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता, हे विशेष. भाजपने 60 सदस्यांच्या त्रिपुरा विधानसभेत 43 जागा जिंकून त्यांचा मित्रपक्ष IPFT सोबत पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. भाजपाने 35 तर आयपीएफटीने 8 जागा जिंकल्या.


हेही वाचा – युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईत रोड शो, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची घेणार भेट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -