घररायगडजिद्द, चिकाटी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्ने साकारता येतात- डॉ. शिवलिंग मेनकुदळे

जिद्द, चिकाटी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्ने साकारता येतात- डॉ. शिवलिंग मेनकुदळे

Subscribe

जिद्द, चिकाटी आणि जाज्वल्य इच्छाशक्ती असेल तर उरी बाळगलेली स्वप्ने साकारता येतात. स्वप्ने अशी पाहावीत की जी आपणास झोपू देत नाहीत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील असेच स्वप्न पाहिले होते. ते म्हणजे समाजाच्या शेवटच्या मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी ते अहोरात्र झटले. त्याचाच परिणाम म्हणून आज रयत शिक्षण संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला दिसतो आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रस्थापित शिक्षण व्यवस्था मोडीत काढत शिक्षण गरिबांच्या झोपडी पर्यंत नेले. त्यांनी समाजातील दलित, पीडित व वंचिताना शिक्षण दिले व महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली, त्यामुळेच आज महाराष्ट्र एक पुरोगामी विचारधारेचे राज्य म्हणून ओळखले जाते, असे , असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.

पनवेल: जिद्द, चिकाटी आणि जाज्वल्य इच्छाशक्ती असेल तर उरी बाळगलेली स्वप्ने साकारता येतात. स्वप्ने अशी पाहावीत की जी आपणास झोपू देत नाहीत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील असेच स्वप्न पाहिले होते. ते म्हणजे समाजाच्या शेवटच्या मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी ते अहोरात्र झटले. त्याचाच परिणाम म्हणून आज रयत शिक्षण संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला दिसतो आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रस्थापित शिक्षण व्यवस्था मोडीत काढत शिक्षण गरिबांच्या झोपडी पर्यंत नेले. त्यांनी समाजातील दलित, पीडित व वंचिताना शिक्षण दिले व महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली, त्यामुळेच आज महाराष्ट्र एक पुरोगामी विचारधारेचे राज्य म्हणून ओळखले जाते, असे , असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी डॉ. मेनकुदळे बोलत होते.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कामगार नेते महेंद्र घरत, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.ए. पाटील, डॉ. नरेश मढवी, रजिस्ट्रार अंनत जाधव, विद्याथीं परिषदेचे अध्यक्ष स्नेहल पाटील, कुमार मनीष पेटकर तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक वर्ग विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये रयत शिक्षण संस्था व महात्मा फुले महाविद्यालयांने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला तर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष डॉ. पराग पाटील यांनी महाविद्यालयाच्या सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील अध्यापक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर तसेच जिल्हा व विद्यापीठ स्तरावार नैपुण्य प्राप्त केले अश्या गुणी शिक्षक व विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहल ठाकूर हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर व डॉ. प्रफुल्ल वशेणीकर व प्रा. शरयू नाईक यांनी केले व या कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.

- Advertisement -

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या शिक्षण प्रणालीमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. त्याचाच वारसा घेऊन आपण पुढे वाटचाल केली तर लवकरच आपला देश महाशक्ती म्हणून उदयास येऊ शकतो. रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारामुळेच आपण घडलो असे कृतज्ञतापूर्ण उद्गार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काढले. महात्मा फुले महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या स्टार कॉलेजच्या दर्जाचे कौतुक करीत महाविद्यालयास उत्तरोत्तर प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छा देतानाच महाविद्यालयास ए + चा दर्जा निश्चित मिळू शकेल असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -