घरमहाराष्ट्रनाशिक'चॉकलेट डे' ला प्रेझेंट, ड्रायफ्रूट चॉकलेटची चलती

‘चॉकलेट डे’ ला प्रेझेंट, ड्रायफ्रूट चॉकलेटची चलती

Subscribe

नुकत्याच अंकुलेल्या नात्यात गोडवा भरणार दिवस

 नाशिक:  नव्याने अंकुरलेल्या नात्यात गोडवा भरणार्‍या व्हॅलेंटाईन्स वीकचा तिसरा दिवस (दि. ९ फेब्रुवारी) चॉकलेट डे म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध आकार आणि चवीचे आकर्षक चॉकलेट्स बाजारात दाखल झाले आहेत. त्यात ड्रायफ्रूट चॉकलेट्स सर्वाधिक भाव खात आहेत. बुधवारी (दि.८) प्रपोज डेच्या निमित्ताने अनेकांना आपले व्हॅलेंटाइन मिळाले.

जगभरात व्हॅलेंटाइन्स वीक साजरा केला जात आहे. फेब्रुवारीत येणारा हा प्रेमाचा उत्सव ७ तारखेपासून सुरू झाला आहे. दरम्यान, 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. प्रेम आणि रोमान्स यांदरम्यान, चॉकलेट डे सेलिब्रेट करण्याचे एक विशेष कारण आहे. यंदाच्या ‘चॉकलेट डे’ला प्रेझेंट व ड्रायफ्रूट चॉकलेटची चलती पाहायला मिळते आहे. विविध रंगबिरंगी बॉक्समध्ये विविध आकारातील चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रेझेंट चॉकलेटमध्ये रिंग, चेन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तु या चॉकलेटमधून निघतात. याशिवाय चॉकलेटचे कोटिंग असलेल्या ड्रायफ्रूट चॉकलेटलाही तरुणांची पसंती मिळत आहे. चॉकलेट हे जगभरात सर्वाधिक आवडणारा गोड पदार्थ आहे.

- Advertisement -

त्यामुळे व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये कपल्स चॉकलेट डे साजरा करून आपल्या प्रियजनांचे तोंड गोड करतात. बहुतेक मुलींना चॉकलेट आवडते. म्हणून या दिवशी मुलींना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला जातो. चॉकलेट देत मुले प्रेम व्यक्त करतात.

चॉकलेटच्या या प्रकारांना विशेष मागणी

 डार्क, व्हाईट व मिल्क असे चॉकलेटचे मुख्य तीन प्रकार पडतात. त्यात या मुख्य प्रकारातल्या चॉकलेट्सचा उपयोग करून अनेक प्रकारचे फ्लेवरच्या चॉकलेटची निर्मिती केली जाते. ड्रायफ्रूट मिश्रित चॉकलेट यंदा लोकप्रिय ठरत आहेत.

- Advertisement -

असे द्या पार्टनरला चॉकलेट

तुमच्या पार्टनरला तुम्ही खास पद्धतीने चॉकलेट डेच्या शुभेच्छा देऊ शकता. एखाद्या छोट्या ग्रिटिंगवर तुमच्या मनातल्या त्यांच्याविषयीच्या भावना लिहून देवू शकता. त्याशिवाय चॉकलेट आणि एक छोटीशी भेटवस्तू आकर्षक गिफ्ट रॅप करून दिल्यास समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडू शकतो.

चॉकलेट डेला या वर्षी प्रेझेंट, ड्रायफ्रूट, हृदयाच्या आकारातल्या चॉकलेला अधिक पसंती मिळते आहे. मुलांकडून ब्रँडेड चॉकलेट्सला अधिक पसंती दिले हाते आहे. यंदा चॉकलेट्सच्या किमती स्थिर आहेत. होममेड चॉकलेटलाही चांगला प्रतिसाद आहे. – गुंजन पवार, चॉकलेट विक्रेती

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -