घरलाईफस्टाईलसह्याद्रीची शान कळसुबाई

सह्याद्रीची शान कळसुबाई

Subscribe

आवरा आता! ट्रेनची वेळ झालीय. ही ट्रेन चुकल्यानंतर इथेच बसावं लागेल. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर बसून हा संवाद चालू होता. सह्याद्रीच्या सह्याद्री डोंगररांगांमध्ये वसलेलं राज्यातील सर्वात मोठं शिखर म्हणजे कळसुबाई! इथे ट्रेकिंगसाठी जाण्याचा प्लॅन  कसारा ट्रेनझाला आणि सर्व तयारी सुरू झाली होती. कित्येक दिवसापांसूनची मनिषा होती कळसुबाईला जाण्याची. रात्री १ वाजता कसारा ट्रेन पकडली आणि आमच्या टीमसोबत धमाल, मस्ती करत कळसुबाईच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. तसं मी केव्हा फेसबुकला काही लिहीत नाही . पण यावेळी मात्र Traveling To Kalsubai अशी पोस्ट टाकली. पहाटे ३.३० वाजता आम्ही कसाराला पोहोचलो. ठरल्याप्रमाणे आमचा नेहमीचा गाडीवाला होता. त्यानंतर गप्पा – टप्पा करत बारी गावात पोहोचलो. आता उत्सुकता होती ती केव्हा एकदाचं चढाईला सुरुवात करतो. तासाभराचा आराम करून अखेर ६.३० वाजता कळसुबाई चढायला सुरुवात केली.

शाळेत असताना पुस्तकामध्ये वाचलेलं हेच ते कळसुबाईचं शिखर! मनात काही क्षण त्या आठवणी जाग्या झाल्या. नजर अगदी टोकाला जाऊन खिळली. शिवाजी महाराज की जय! असा जयघोष करत ट्रेक लिडरच्या सूचनांचं पालन करत चढाईला सुरुवात झाली.

- Advertisement -

कळसुबाईची उंची ५४०० फूट आहे. चढाईला मध्यम असं असलेलं कळसुबाई चढताना शरीराचा कस लागतो. सहज वाटणारा हा ट्रेक तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहतो. त्यामुळे ’ट्रेकिंगला केव्हा गेलात तर थोडं जपूनच. उगाच होश मे जोश मत खोना!

चढाईला साधारण आम्हाला तीन तास लागले. यावेळी प्रत्येक वयोगटातील माणसं भेटत होती. त्यांचा उत्साह बरंच काही सांगून जात होता. तशी थंडी होती. पण चढाईला सुरुवात केल्यानंतर ती कुठच्या कुठे पळून गेली. काही वेळ विश्रांती घेत माहिती घेत अखेर आम्ही कळसुबाई सर केला. टोकावरून दिसणारा नजारा, आहा! माथ्यावर कळसुबाईचं मंदिर आहे.चढाई करताना वाटेत तुम्हाला कलिंगड, लिंबूपाणी, नाष्टा, जेवण इत्यादींची दुकानं देखील लागतात.

- Advertisement -

कळसुबाईच्या माथ्यावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रृंगी, मार्कंडा, धेडप, रवळ्या-जवळ्या, कोळधेर ,अशी डोंगररांग नजरेला पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान आणि हरिश्चंद्रगड देखील नजरेस पडते. या सार्‍याबद्दल माहिती घेत अखेर आमचा मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -