घरमहाराष्ट्र११ सायकलपटूंची ६०० किमी सायकलिंग ब्रेवे

११ सायकलपटूंची ६०० किमी सायकलिंग ब्रेवे

Subscribe

नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या सायकलिंग ब्रेवे स्पर्धेत ११ सायकलपटूंनी ६०० किमी सायकलिंग ब्रेवे पूर्ण केली.

नाशिक शहरात सायकलिंग ब्रेवेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ११ सायकलिस्टसने ६०० किमी बीआरएम राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मुंबईकर असलेल्या एका सायकलिस्टसह नाशिककर सायकलिस्टस अशा एकूण १८ सायकलिस्टसने यात सहभाग नोंदविला होता. ही राईड मुंबई नाका, नाशिक-धुळे राष्ट्रीय महामार्ग ३ वरून इंदूर मार्गावरील घुलानिया (३०२ किमी) ते पुन्हा धुळे आणि नाशिक (६०४ किमी) अशा मार्गावर झाली. राईड यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ४० तासाचा वेळ देण्यात आला होता.

अशी सुरुवात झाली स्पर्धेला

शनिवारी सकाळी ६ वाजता १८ सायजलिस्टने राईड सुरू करण्यात आली होती. या सर्वांना कट आँफ टाईम ठरवून देण्यात आला होता. धुळे येथे संध्याकाळी ०४.०८ घुलाणीया (मध्य प्रदेश) येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ०२.०८ तर परत धुळे येथे दुपारी १२.०८ अशी कटऑफ वेळ देण्यात आली होती. यात ११ सायकल पटूंनी हे सगळे पल्ले पार करत सायंकाळी ७ ते रात्री ८.४० पर्यंत एकामागोमाग यशस्वी रित्या पार केले आहे. काही सायकलस्वरांनी केवळ १ ते ४ तासांची झोप घेत त्यांनी ६०० किमी अंतर निरंतर सायकल चालवून सदर बीआरएम पूर्ण केली आहे.

- Advertisement -

चांदवड घाट, लळींग घाट आणि पळसनेर घाट अशा तीन घाटांचे आव्हान पेलले आहे. चांदवडच्या घाटात सलगपणे असलेले मोठे चढ आणि उतार करत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवर पालसनेर परिसरातील बिजासन माता मंदिर घाट पूर्ण केले. विशेष म्हणजे यात दिनकर पाटील व मानिक निकम यांनी सिंगल स्पिड (गिअर शिवाय) टँडम सायकलवर पूर्ण केले. तसेच भिमराव अडाव यांनी ही सिंगल स्पिड (गिअर शिवाय) सायकलवर पूर्ण केले.

७ सायकलिस्टसने सुपर रँडोनर्स पटकावला बहुमान

या बीआरएम चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रतन अनकोलेकर, डॉ. राहूल सोनावणी, गोरकक्षनाथ शिंदे, गणेश माळी, हिरेण संघवी (मुंबई), आशिष भट्टड, दिनकर पाटील या ७ सायकलिस्टसने २०१८-१९ या कॅलेंडर मधील सुपर रँडोनर्स हा बहुमान पटकावला आहे. यात वर्षभरात २००,३००,४०० आणि ६०० किमीची हे ब्रेवे पुर्ण केल्यास एक सुपर रँडोनियरचा बहुमान मिळतो. यांच्यासह रामदास सोनावणे, समीर मराठे, मानिक निकम आणि भिमराव अडाव अशा ११ सायकलीस्टनी ब्रेवे ६०० पुर्ण केली.

- Advertisement -

भाग घेतलेले सायकलपटू

रतन अनकोलेकर, डॉ. राहूल सोनावणी, गोरकक्षनाथ शिंदे, गणेश माळी, रामदास सोनावणे, हिरेण संघवी (मुंबई), दिपक वाघ, नितीन देशमुख, समीर मराठे, अशीश भट्टड, सत्यजीत दातीर, अभिजीत मोरे, दिनकर पाटील, मानिक निकम, साहेबराव कासव, निखील भावसार, भिमराव अडाव व मोहनसिंग राजपूत.

या सायकलिस्टसने पूर्ण केली ६०० किमीची बीआरएम

रतन अनकोलेकर, डॉ. राहूल सोनावणी, गोरकक्षनाथ शिंदे, गणेश माळी, हिरेण संघवी (मुंबई), आशिष भट्टड, दिनकर पाटील, रामदास सोनवणे, समीर मराठे, मानिक निकम आणि भिमराव अडाव यांनी ६०० किमीची बीआरएम पूर्ण केली आहे. यावेळी संपूर्ण राईडमध्ये रायडर्सची काळजी घेणारे मार्शल्स तसेच आयोजन करण्यास यशवंत मुधोळकर आणि संदीप परब यांचे मोलाचे सहकार्य डॉ. महेंद्र महाजन यांना मिळाले आहे. सर्व फिनिशर रायडर्सचे स्वागत नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया आणि सदस्यांच्या हस्ते करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -