घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023औरंगझेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर होणार कारवाई; अंबादास दानवेंच्या मागणीवर सरकारची ग्वाही

औरंगझेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर होणार कारवाई; अंबादास दानवेंच्या मागणीवर सरकारची ग्वाही

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज (ता. ०८ मार्च) विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यानंतर औरंगझेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगझेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज (ता. ०८ मार्च) विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यानंतर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली आहे.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करणाऱ्याला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. परंतु या नामांतरणाला एमआयएम पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यास बसले आहे.

- Advertisement -

परंतु या नामांतरणाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केलं जातंय याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मागणी केलेल्या प्रश्नाला सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. तसेच औरंगजेबाच समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
केंद्राने औरंगाबादच्या नामांतरणाला मंजुरी दिल्यानंतर या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. परंतु एमआयएमने या नामांतरणाला विरोध करत इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यास सुरुवात केली. या आंदोलनात त्यांच्याकडून औरंगजेबाचे फोटो देखील झळकवण्यात आले. ज्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला. त्यामुळे याप्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – “विरोधकांचे मगरीचे अश्रू आहेत”; देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं

दरम्यान, याआधी सुद्धा एमआयएमने औरंगझेबावर आपले प्रेम व्यक्त केले होते. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे जेव्हा याआधी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते, तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी सुद्धा महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -