घरमहाराष्ट्रनाशिकगाव नशामुक्त करण्यासाठी महिलांनी कसली कंबर; घेतला 'हा' निर्णय

गाव नशामुक्त करण्यासाठी महिलांनी कसली कंबर; घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

नाशिक : कळवण व दिंडोरी या दोन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या दरेगाव वणी या गावात मद्यपींना वठणीवर आणण्याचा निर्णय रणरागिणींनी घेतला असून मद्यपान करुन असभ्य वर्तन गावात केले तर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारुन त्या रकमेचा गावच्या विकासासाठी विनीयोग केला जाणार आहे .

याबाबत माहिती अशी की, कळवण तालुक्यात सुमारे ६०० ते ७०० लोकवस्तीचे दरेगाव वणी हे वणी-नांदुरी रस्त्यावरील गाव आहे. दुग्ध व खवा विक्रीसाठी हे गाव परिचित आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची कृषी उत्पादने घेण्याचा कल या भागातील शेतकरी वर्गाचा आहे. सप्तशृंगगडावर कोजागिरी पौर्णिमा व चैत्र पौर्णिमेला ध्वजारोहण करण्याची ५०० वर्षांची परंपरा या गावची आहे. गवळी कुटुंबियांकडे याचा मान आहे एकोपा, शांतता, बंधूभाव, एकमेकांना अडीअडचणीत मदत करण्यात येथील ग्रामस्थ अग्रभागी असतात.

- Advertisement -

धार्मिक परंपरा असलेल्या गावाला नजर लागली ती बोटावर मोजण्याइतक्या मद्यपींची गेल्या काही कालावधीपासून या गावातील काही लोक बाहेरुन मद्यपान करुन येत व गावातील शांतता भंग होईल असे वर्तन करत तसेच कौटुंबिक कलह लहान मुलांवर प्रतिकुल परीणाम भांडणतंटे यामुळे गावातील वातावरण एकूणच सामाजिक व कुटुंब व्यवस्थेला मारक असल्याचे जाणवले. याला आळा घालण्यासाठी गावातील रणरागिणींनी धाडसी निर्णय घेतला. गावात मद्यपान करुन कोणी आले तर दंडात्मक कारवाई पंचमंडळीने करावी व ही रक्कम गावच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास कामांसाठी वापरावी असा विचार मनात आल्याने गावातील महिला वर्गाची बैठक घेण्यात आली व त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. महिलांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -