घरदेश-विदेशदेशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले, केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले, केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

Subscribe

Corona Guidelines | नवी दिल्ली – देशात आता विषाणूचे दुहेरी संकट निर्माण झाले आहेत. H3N2 Influenza विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच कोरोनानेही पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण (Corona) झपाट्याने वाढत असून देशात सध्या कोरोनाचे ५९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा हा वेग पुन्हा वाढू नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

- Advertisement -
  • पाच दिवसांपेक्षा जास्त खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • श्वास घेण्यास अडचण, ताप असेल तर तत्काळ डॉक्टरांकडून उपचार करून घ्या.
  • बॅक्टेरिअल इन्फेक्शनची शंका आल्यास अँटीबायोटिकचा वापर करू नये
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रेमडेसिव्हिर औषधं घ्या
  • गंभीर लक्षणे आणि उच्च ताप असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिव्हिर औषधं घ्यावीत
  • सौम्य आजारांवर सिस्टिमिक आणि कार्टिकोस्टिरॉईड्स घेऊ नका
  • मास्कचा वापर करा
  • सुरक्षित सामाजिक अंतर राखा
  • शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे निरिक्षण करा

कोरोनाची देशातील स्थिती काय (Corona Update in India)

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशातील लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात आले. जून महिन्यात लोक लॉकडाऊनमधून पूर्णपणे बाहेर पडले. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. मधल्या काळात कोरोनाचा वेग कमी झाला होता. परंतु, गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होताना दिसतेय. काल भारतात एका दिवसांत १ हजाराहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या १२९ दिवसांत ही सर्वाधिक वाढ आहे. सध्या देशात ५ हजार ९१५ सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना देशात H3N2 रुग्णांचीही वाढ होत आहे. तसंच, या विषाणूंसह देशात अजून किती संसर्गजन्य विषाणू सक्रीय आहेत, याची नोंद करण्याच्या सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत. तसंच, ज्या राज्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण अधिक आहेत, त्या राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिले आहे. गुरुवारी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्य सरकारांना कोविड चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरणाच्या धोरणाचं पालन करण्यासाठी पत्र लिहिलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -