घरमनोरंजन'Dunki' चित्रपटातील शाहरुख खानचा First Look आला समोर

‘Dunki’ चित्रपटातील शाहरुख खानचा First Look आला समोर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील वर्षी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. अशातच आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यात शाहरुख हिरवा टी-शर्ट, फंकी घड्याळ आणि खांद्यावर लटकलेल्या बॅगेसोबत दिसत आहे. यात शाहरुख सोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी देखील दिसत आहेत. सध्या शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपटातील फर्स्ट लूक पाहून चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

‘डंकी’ मधील शाहरुखचा फर्स्ट लूक रिलीज

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखचा हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट बेकायदेशीरपणे यूएस आणि कॅनडामध्ये जाणाऱ्या भारतीयांच्या कथेवर आधारित असणार आहे. यात शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. दरम्यान, यापूर्वी जानेवारी मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने भारतात तसेच जगभरात करोडोंची कमाई केली.

- Advertisement -

‘जवान’मध्ये देखील दिसणार शाहरुख

‘पठाण’, ‘डंकी’नंतर शाहरुख जवान चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. जवानमध्ये साऊथ अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसेल. जवान चित्रपट देखील 2023 मध्येच प्रदर्शित होणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

अमिताभ बच्चननंतर हा अभिनेता झाला जखमी; चित्रिकरणादरम्यान अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -