घरमहाराष्ट्रपुणेते तर शूद्र लोक...; औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरून भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले

ते तर शूद्र लोक…; औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरून भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले

Subscribe

 

पुणेः औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलून काही साध्य होणार नाही. औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा. मुळात शहरांची नावे बदलणारी लोकं शुद्र आहेत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

वादग्रस्त वक्तव्यामुळे नेमाडे हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन राजकीय घमासान सुरु आहे. काही मुस्लिम संघटनांनी या नामांतराला विरोध केला आहे. त्यात आता नेमाडे यांच्या वक्तव्यामुळे या वादाला अजून बळ मिळाले आहे.

सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेच्यावतीने नेमाडे यांची देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात आली. त्यावेळी नेमाडे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची मागणी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. शहारांची नावे बदलून काही साध्य होणार नाही. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट होत गेली. तसा आता आपल्या संस्कृतीचा अंत सुरु झाला आहे. भारतात लोकशाही धोक्यात आली आहे. सत्य बोलणाऱ्याला पोलीस संरक्षण घेऊन फिरावे लागत आहे. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना नष्ट झाल्या पाहिजेत, असा टोलाही नेमाडे यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

इंग्रजी शाळेत शिकणारी मुले पुढे जाऊन काहीच करु शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वसाचा अभाव असतो. तसेच प्रत्येकाची भाषा प्रमाण आहे. मराठी भाषाच प्रमाण आहे, असं काही नाही. इंग्रजांनी मराठी भाषेचा कोष करण्याचे काम चित्पावन ब्राम्हणांना दिले होते. त्यामुळे ती भाषा प्रमाणित मानली गेली, असेही नेमाडे यांनी सांगितले.

नेमाडे म्हणाले, ज्या मातीत आपण जन्माला आलो, तिच्याशी कृतज्ञ राहायला हवे. यालाच देशावाद म्हणतात. कम्युनिस्टांनी जातीचे वास्तव नाकारले. त्यामुळे ते संपले आहेत.

हिंदू’ कांदबरीच्या पुढल्या भागात खंडेराव हा पुरातत्व खात्यात नोकरी सुरु करतो. पुरातत्व संशोधन करत तो तक्षशीलेला पोहचतो. तेव्हा त्याला ग्रीस आणि  युरोपातून इथे लोक शिक्षणासाठी येत असल्याचं जाणवतं, असे कादंबरीत असणार असल्याची माहिती नेमाडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -