घरदेश-विदेशPakistan Economic Crisis : आर्थिक गर्तेत सापडलेले्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख चीन दौऱ्यावर

Pakistan Economic Crisis : आर्थिक गर्तेत सापडलेले्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख चीन दौऱ्यावर

Subscribe

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. (Pakistan Economic Crisis) याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Pakistan Army chief General Asim Munir) चीनमध्ये (China) दाखल झाले आहेत. ते चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढवणे हा या भेटीचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानी लष्कराची धुरा हाती घेतल्यानंतर जनरल मुनीर यांचा गेल्या पाच महिन्यांतील हा चौथा विदेश दौरा आहे. यापूर्वी मुनीर यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि युनायटेड किंगडम या देशांचे दौरे केले होते. युनायटेड किंग्डमच्या दौऱ्यानंतर जनरल मुनीर यांनी पुन्हा यूएईला भेट दिली होती.

- Advertisement -

पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखेने 24 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात या चीनभेटीची माहिती दिली होती. द्विपक्षीय लष्करी संबंध वाढवण्यासाठी लष्करप्रमुख चीनच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. मात्र, या भेटीदरम्यान आर्थिक मदतीबाबत काही बोलणी होणार आहे का, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. साधारणपणे नव्यानियुक्त लष्करप्रमुखाने पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांतच चीनला भेट देणे, हे पाकिस्तानमध्ये काही विशेष नाही. उलट, यावेळी विलंब झाला असून यासाठी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

विदेशी चलनाच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) वाढत्या दबावादरम्यान ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पाकिस्तानला किमान 6 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. आतापर्यंत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे वचन दिले आहे, परंतु आंतरराष्ट्रीय कर्जदारांनी उर्वरित रकमेसाठी निश्चित कालावधीचे आश्वासन मागितले आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती व्यतिरिक्त चीन हा एकमेव देश आहे, जो पाकिस्तानला मदत देत असतो, असे मानले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -