घररायगडजिल्ह्यात २६४ शाळांमध्ये ४,२५६ जागा आरक्षित; मोबाईलवर येणार मेसेज

जिल्ह्यात २६४ शाळांमध्ये ४,२५६ जागा आरक्षित; मोबाईलवर येणार मेसेज

Subscribe

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हमखास प्रवेशाची हमी मिळते शिक्षण विभागामार्फत ज्यांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे, अशा विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २६४ शाळांमध्ये चार हजार २५६ जागा आरक्षित असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणार्‍या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ५ एप्रिल रोजी आरटीईची लॉटरी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत प्रवेशासाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर मेसेज येणार आहे.

अलिबाग: शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हमखास प्रवेशाची हमी मिळते शिक्षण विभागामार्फत ज्यांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे, अशा विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २६४ शाळांमध्ये चार हजार २५६ जागा आरक्षित असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणार्‍या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ५ एप्रिल रोजी आरटीईची लॉटरी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत प्रवेशासाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर मेसेज येणार आहे.
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ठ्या परवडत नाही अशा विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सरकार आरटीआय कायद्यानुसार काही जागा आरक्षित करून ठेवते. दरवर्षी राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील एकूण प्रवेश क्षमतेतील २५ टक्के जागा राखून ठेवल्या जातात. कायद्यानुसार संबंधित शाळांसाठी ते सक्तीचे आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातून १० हजार ४७१ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. संबंधित यंत्रणेमार्फत अर्जाची पडताळणी होणार आहे त्यानंतर लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या पाल्याला नामांकित शाळेत प्रवेश मिळाला की नाही याची माहिती उपलब्ध होणार आहे

प्रवेशावेळी अर्जातील माहितीची होणार पडताळणी
प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित शाळेत जाताना पालकांनी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, अशी प्रवेश अर्जावेळी भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे घेऊन जावी लागतील. तसेच खुल्या प्रवर्गातील एसईबीसी प्रवर्गातील मुलांसाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा पालकांचा उत्पन्न दाखला लागतो. दरम्यान, प्रवेश निश्चित झालेल्या म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -