घररायगडबाजारात कलमी, हापूस, केशर आंब्यांना मागणी

बाजारात कलमी, हापूस, केशर आंब्यांना मागणी

Subscribe

आंबा हे आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक घटकांसह एक स्वादिष्ट फळ आहे.उन्हाळ्याची वेळ या आणि प्रत्येकजण एकाच फळाची आतुरतेने वाट पाहतो ते फळांचा राजा असलेल्या आंब्याचीच. याच आंब्याच्या विविध चविष्ट जातींना ग्राहकांची मोठी मागणी आहे. खोपोली बाजारात कोकणचा रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर कलमी हापूस, पायरी, रायवळ आणि अन्य ठिकाणांहून येणार्‍या आंब्याची आवक वाढल्याने तसेच में महिन्यात आंब्यांचे दर उतरल्याने पहाटे पाच वाजल्यापासून आंबा खरीदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

हाळखुर्द: आंबा हे आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक घटकांसह एक स्वादिष्ट फळ आहे.उन्हाळ्याची वेळ या आणि प्रत्येकजण एकाच फळाची आतुरतेने वाट पाहतो ते फळांचा राजा असलेल्या आंब्याचीच. याच आंब्याच्या विविध चविष्ट जातींना ग्राहकांची मोठी मागणी आहे. खोपोली बाजारात कोकणचा रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर कलमी हापूस, पायरी, रायवळ आणि अन्य ठिकाणांहून येणार्‍या आंब्याची आवक वाढल्याने तसेच में महिन्यात आंब्यांचे दर उतरल्याने पहाटे पाच वाजल्यापासून आंबा खरीदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. मार्च आणि एप्रिच्या अखेरीस हापूस आंब्याचे भाव ७०० ते १००० रुपये डझन होते मात्र आता कच्चे आणि तय्यार हापूस आंबा ३०० ते ४०० रुपये डझन दराने मिळत आहेत. केशर २५०, कलमी ३००, देवगड २५० रुपये, दराने मिळत असल्याने शहारासह तालुक्यात आंबा खरेदीसाठी खोपोली बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गोड आणि रसाळ फळांचा राजा जिल्ह्यात आंब्याच्या अनेक जाती आढळतात आणि प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे. गुलाबी लाल असा गुलाब खास किंवा सिंधुरा, पोपट चोचीच्या आकाराच्या तोतापुरी तसेच सुमारे ३०० ग्रॅम वजनाचा नामांकित रत्नागिरी हापूस, केशर,कलमी, पायरी, रायवळी ज्यांचा एक अनोखा सुगंध आहे. अशा आंब्याच्या अनोख्या जाती जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत उपलब्ध असतात.
बॉक्स..
मोठी आर्थिक उलाढाल
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच रायगडमधील पेण, अलिबाग,कर्जत, खालापूर, सुधागड तालुक्यांतील धर्तीवर अनेकांनी आंब्याच्या बागा फुलवल्या आहेत. यात देवगड हापूस जातीचे प्रमाण कमी असले तरी सर्वाधिक विकला जाणारा हापूस ,केशर,कलमी,पायरी, रायवरी विक्रीत आंब्याचे मोठे प्रमाण अधिक आहे.काही बागायतदार शेतकरी, शेतघराचे मालक स्थानिक आदिवासी, ठाकर समाजाच्या मदतीने आपला आंबा शहरात विक्रीसाठी नेतात. त्यामुळे स्थानिकांनाही आंबा विक्रीतून रोजगार मिळू लागला आहे. सुधागड, पेण, कर्जत, खालापूर भागांतील काही आदिवासी समूहाने आंबा बागा राखण्यासाठी घेत असतात. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन स्थानिकांना आधार मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -