घरलाईफस्टाईलपरीक्षेचा ताण कमी करा

परीक्षेचा ताण कमी करा

Subscribe

येत्या काही दिवसांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशात विद्यार्थी अभ्यास करण्यावर आणि तो लक्ष ठेवण्यावरही भर देत आहेत. केलेला अभ्यास परीक्षेत वेळेवर आठवेल की नाही, या भीतीने विद्यार्थी दिवसरात्र फक्त अभ्यासच करत आहेत. दिवसभर अभ्यास केल्याने मुले आजारी पडू शकतात. तज्ज्ञांच्या मते अभ्यास करताना मुलांनी रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर करावा. पंरतु, तणाव वाढेल असे टेक्निक वापरू नये. सलग अभ्यास न करता ठरावीक वेळेनंतर एक तास तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. याने मेंदूवरील ताण कमी होऊन तुम्हाला ताजेतवाणे वाटेल. मनाला रिफ्रेश करण्यासाठी म्यूझिक थेरपी एक चांगला पर्याय आहे. याने केवळ थकवाच दूर होत नाही तर परीक्षेचा ताणही काही प्रमाणात कमी होतो. गणित, आकाऊंट्स, फिजिक्स या विषयाचा अभ्यास करताना लाइट म्यूझिक ऐकू शकता.

रिलॅक्सेशनसाठी करा उपाय
एका ठिकाणावर बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
लवकर थकवा आणणारे खेळ खेळू नका.
सायकल चालवणे, पायी चालणे किंवा थोडावेळ व्यायाम करणे चांगले पर्याय आहेत.
१५ ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहू नये यांनी डोळ्यांवर ताण येतो.
काही वेळासाठी योगाही करू शकता.
इंटरनेट सर्फ करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -