घरदेश-विदेशमी आंदोलन करतच राहणार - अण्णा हजारे

मी आंदोलन करतच राहणार – अण्णा हजारे

Subscribe

'कुणी काहीही बोलूदे, माझ्यावर कितीही आरोप लावूदे मी माझ्या देशासाठी आणि देशवासीयांच्या हक्कासाठी यापुढेही प्रामाणिक आंदोलन करत राहणार', असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन केलेले उपोषण नुकतेच मागे घेतले. याच आंदोलनाविषयी अण्णांनी अहमदनरग येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राळेगणसिद्धीत झालेल्या उपोषणला लोकांकडून मिळालेल्या प्रतिसाबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना, २०११ मधील आंदोलनापेक्षा आता राळेगणसिद्धीमध्ये झालेल्या आंदोलनात कमी गर्दी जमल्याचे अण्णांनी मान्य केले. मात्र, त्याचवेळी ‘कुणी काहीही म्हणू दे यापुढेही हक्कासाठी मी प्रामाणिकपणे आंदोलन करतच राहणार’, असे वक्तव्यही त्यांनी केले. सध्या सोशल मीडियावर ‘अण्णांचे आंदोलन आश्वासनावर सुटले’, अशी टीका केली जात आहेत. दरम्यान, राळेगणसिद्धीतील उपोषणाला कमी प्रतिसाद मिळाल्याला टीम अण्णामधील अनेकांच्या वैयक्तिक महत्वकांक्षा कारणीभूत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अण्णा म्हणाले की, ‘२०११ मधील आंदोलनावेळी जुळून आलेल्या टीम अण्णांकडून देशाला मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण कालांतराने टीम अण्णांमधील कुणाला मुख्यमंत्री व्हायची, कुणाला राज्यपाल, तर कुणाला मंत्री व्हायची इच्छा जडली. या वैयक्तिक आकांक्षेपोटी आणि लोभापोटी लोकांमध्ये आम्ही निर्माण केलेला विश्वास काही प्रमाणात कमी झाला. अण्णांच्या टीमचेच सदस्य अण्णांसोबत नाहीत, अशी भावना कुठेतरी जनतेच्या मनात निर्माण झाली आणि यामुळे त्यांचा आमच्यावरचा विश्वास तुटत गेला.’
‘मात्र, कुणी काहीही बोलूदे, माझ्यावर कितीही आरोप लावूदे मी माझ्या देशासाठी आणि देशवासीयांच्या हक्कासाठी यापुढेही प्रामाणिक आंदोलन करत राहणार’, असं अण्णांनी जाहीर केलं. ‘मी एक फकीर आहे.. मला केवळ माझ्या देशाची आणि लोकांची काळजी आहे. त्यामुळे यापुढील माझ्या प्रत्येक आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल,’ असंही ते यावेळी म्हणाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -