घरदेश-विदेशवायूसेनेचे मिग- २७ लढाऊ विमान कोसळले; पालयट सुरक्षित

वायूसेनेचे मिग- २७ लढाऊ विमान कोसळले; पालयट सुरक्षित

Subscribe

विमान कोसळत असताना पायलटने पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा जीव वाचवला. या दुर्घटनेप्रकरणाची न्यायालयिन चौकशी केली जाणार आहे.

वायू सेनेच्या मिग – २७ या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास राजस्थानच्या जैसलमेरजवळ विमान कोसळले. जैसलमेर जिल्ह्यातल्या रामदेवरा गावाच्याजवळ शेतामधअये हे विमान कोसळले. या दुर्घटनेमध्ये विमानाचा पायलट सुरक्षित आहे. विमान कोसळत असताना पायलटने पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा जीव वाचवला. या दुर्घटनेप्रकरणाची न्यायालयिन चौकशी केली जाणार आहे. घटनेची माहिती मिळताच वायूसेना आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ‘दैनंदिन प्रशिक्षण सुरू असताना आज संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान जैसलमेरमध्ये मिग-27 विमान कोसळलं. पोखरणमधल्या रामदेवरा गावाच्याजवळ शेतामध्ये कोसळल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी दिली. वैमानिकानं विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचले. पायलट सुरक्षित आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये विमान जळून खाक झाले आहे. याप्रकरणाची चौकशी होणार आहे. असे देखील सांगितले जात आहे की, मिग – २७ हे विमान वायुसेनेतील सर्वात जुन्या विमानांपैकी एक आहे. वायूसेनेत नविन विमान न आल्यामुळे हे विमान रिटायर होत नाहिये.

- Advertisement -

वायूसेनेचा होणार कार्यक्रम 

वायूसेनेचे मिग – २७ हे लढाऊ विमान काही तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. याआधी देखील मिग- २७ कोसळल्याची घटना झाली होती. १६ फेब्रुवारीला पोखरण रेंजमध्ये भारतीय वायुसेनेचा एक अभ्यास करणार आहे. यामध्ये १३० पेक्षा अधिक फाइटर, ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत.

मिराज २००० ला अपघात 

१ फेब्रुवारीला बंगळुरु येथे मिराज २००० या भारतीय लढाऊ विमानाला अपघात झाला होता. या अपघातामध्ये दोन पायलटचा मृत्यू झाला होता. बेंगळुरूतील एचएएल विमानतळावर उतरत असताना सव्वा अकराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली होती. स्क्वाड्रन लीडर नेगी आणि स्क्वाड्रन लीडर अबरोल अशी अपघातात मृत्यू झालेल्या वैमानिकांची नावे आहेत. दोन्ही पायलटनी हवेत विमानाला आग लागताच पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -