घरमुंबईभारतात पहिलाच प्रयोग; प्रत्यारोपणासाठी ठाणे ते दादर लोकल ट्रेनने आणले यकृत

भारतात पहिलाच प्रयोग; प्रत्यारोपणासाठी ठाणे ते दादर लोकल ट्रेनने आणले यकृत

Subscribe

भारतात आतापर्यंत अनेक अवयवदान झाली आहेत. ग्रीन कॉरिडॉरच्या साहाय्याने रुग्णालयांमध्ये अवयव पोहोचवले जातात. पण पहिल्यांदाच ट्रेनच्या माध्यमातून यकृत मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. तर अशा पद्धतीने एखादा अवयव रुग्णालयांमध्ये पोहोचवणं ही घटना फक्त मुंबईतच नव्हे तर भारतातून पहिल्यांदा झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ठाण्यातील ५३ वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला होता. अपघातात जबर मार बसल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारांदरम्यान त्यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. मृत व्यक्तीने अवयवदानासाठी आधीच नाव नोंदणी केली असल्यामुळे कुटुंबियांना अवयवदानाबाबत माहिती होती.

- Advertisement -

प्रत्यारोपणासाठी यकृत आणले लोकल ट्रेनने

भारतातील पहिलीच घटना. अवयव प्रत्यारोपणासाठी पहिल्यांदाच यकृत आणले ट्रेनने. २५ मिनिटांत केला ठाणे ते दादर प्रवास

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, 15 February 2019

त्यानुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीने यकृत दान केलं आहे. या व्यक्तीला ह्रदय ही दान करायचे होते, पण आधीच त्यांच्या ह्रदयावर शस्रक्रिया झाली असल्याकारणाने ते दान करता आलं नाही. परळच्या ग्लोबल रुग्णालयातील एका व्यक्तीला यकृताची गरज असल्याकारणाने यकृत ठाणे ते दादर ट्रेनने आणण्यात आलं.

- Advertisement -

असं आणलं यकृत

यकृत जिवंत राहण्याची किमान क्षमता ३ ते ४ तास इतकी असते. पण, दुपारची वेळ असल्याने ठाणे ते दादर रुग्णवाहिकेतून यकृत आणणे सोपे नव्हते. त्यामुळे, ज्युपिटर रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी यकृत कमी वेळात दादरला नेता यावं यासाठी ट्रेनचा पर्याय निवडला. त्यानुसार ज्युपिटर रुग्णालय ते ठाणे स्थानक ग्रीन कॉरिडॉर तयार केला गेला. ठाण्याहून ३.०४ ची फास्ट लोकल पकडून ती ट्रेन दादरला ३.३५ मिनिटांनी पोहोचली. असा २५ मिनिटांचा प्रवास यकृताने ट्रेन केला. त्यानंतर हे यकृत दादर स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून ग्लोबल रुग्णालयात तात्काळ नेण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -